Manoj Jarange । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. या आरोपींवर हत्येच्या गुन्ह्यामध्ये एसआयटीने (SIT) मोक्का लावला आहे. एसआयटीच्या या निर्णयामुळे आरोपींना जामीन मिळणे अवघड झाले आहे. पण सध्या वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली असल्याने त्याच्यावर मोक्का लावण्यात आला नाही.
एसआयटीच्या या निर्णयानंतर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारकडे एक मोठी मागणी केली आहे. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात धनंजय मुंडेंनी (Dhananjay Munde) पसरवलेल्या गुंडगिरीच्या नेटवर्कचा नायनाट करावा. कारण हे बलात्कार करतात. हे दरोडे, खून करतात. अंतरवलीतही परळीपासून ते मुंबईपर्यंतच्या तक्रारी येत असल्याचा दावा जरांगे यांनी केला आहे.
Manoj Jarange Patil Demand
“मुख्यमंत्र्यांनी खंडणी आणि खून करणाऱ्यांच्या या साखळीला कलम ३०२ मध्ये गुन्हा दाखल करावा,” अशी जरांगे पाटील यांनी मागणी केली. दरम्यान, आता मनोज जरांगे पाटील यांच्या या मागणीवर आता देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या :