Walmik Karad । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणी खंडणीच्या आरोपात अटकेत असणाऱ्या वाल्मिक कराड याच्या अडचणीत दिवसेंदिवस भर पडत चालली आहे. आजच त्याच्या मुलाने त्याच्या मॅनेजरला धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. तर अशातच आता वाल्मिक कराड याचा आणखी एक कारनामा समोर आला आहे.
वाल्मिक कराडने सोलापूरसह राज्यातील 140 ऊसतोड यंत्रमालकांची तब्बल 11 कोटी 20 लाखांची फसवणूक केली असल्याचा आरोप ऊसतोड यंत्रमालक दिलीप नागणे यांनी केला आहे. (Walmik Karad Scam) शासकीय अनुदानातून ऊस तोडणी यंत्राचे (Sugarcane harvester scam) 36 लाख रुपये मिळवून देतो, असे सांगून कराडने 140 शेतकऱ्यांना फसवल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, आज एसआयटीकडून सुदर्शन घुले,कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, सिद्धार्थ सोनावणे आणि जयराम चाटे या सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. पण सध्या वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली असल्याने त्याच्यावर मोक्का लावण्यात आला नाही.
Walmik Karad Sugarcane Harvester Scam
मागील काही दिवसांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का (MCOCA charges) लावावा, अशी मागणी केली जात होती. आज अखेर ही मागणी मान्य केली आहे. एसआयटीच्या या निर्णयामुळे आरोपींना जामीन मिळणे अवघड झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :