दिल्ली : नीट (NEET) पेपर लीक प्रकरणाने मोठी खळबळ उडवून दिली आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथे ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) च्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन आता केवळ दिल्लीपुरते मर्यादित राहिलेले नाही. त्याचा प्रभाव देशभर पसरला असून मुंबई आणि इतर प्रमुख शहरांमध्येही नीट पेपर लीकविरोधात निदर्शने होत आहेत.
काल जंतर-मंतरवर जमावाने थेट पोलिसांना लक्ष्य केले. आंदोलनाचे धक्कादायक व्हिडिओ समोर येत आहेत आणि आंदोलक आक्रमक होत आहेत. हे आंदोलन हिंसक वळण घेत असल्याचे दिसून येत आहे. धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आंदोलक ठाम आहेत आणि आंदोलनाची व्याप्ती वेगाने वाढत आहे. प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपांमुळे देशभरातील तरुणांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि परीक्षा पद्धतीत सुधारणांच्या मागणीसाठी हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असली तरी, सरकारने त्यांचा राजीनामा मागितलेला नाही. या भूमिकेमागे महत्त्वाची कारणे आहेत, ज्यामध्ये त्यांनी गेल्या १२ वर्षांपासून सलग मंत्रीपद भूषवले आहे, या गोष्टीचाही समावेश आहे. विद्यार्थी रस्त्यावर उतरले असले तरी त्यांच्या राजीनाम्यासाठी कोणतीही हालचाल झालेली नाही. मात्र, सरकार आंदोलकांशी चर्चा करण्यास तयार आहे.
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह (Jitendra Singh) यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना चर्चेसाठी आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, सरकार विद्यार्थ्यांच्या सर्व तक्रारी ऐकून घेण्यास आणि या समस्येवर तोडगा काढण्यास पूर्णपणे तयार आहे. त्यांनी माहिती दिली की, सरकारने २४ तासांच्या आत चार प्रस्ताव (4 Proposal) पाठवून विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या वेळी आणि कालावधीत चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आले होते.
या चर्चा आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा (JP. Nadda) यांच्या निवासस्थानी किंवा कार्यालयात होऊ शकत होत्या. मात्र आंदोलकांनी सरकारचा हा प्रस्ताव फेटाळून लावला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठी घोषणा केली की, नीट पेपर लीक प्रकरणाची सुनावणी फास्ट-ट्रॅक न्यायालयात केली जाईल. या घोषणेनंतर, ‘कॉकरोच जनता पार्टी’ने धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, ही मागणी पुन्हा एकदा लावून धरली.
📌 महत्वाच्या बातम्या
- NEET Protest : पोलिसांची गाडी अडवणारी तरुणी कोण? VIDEO व्हायरल…
- CJP ची देशव्यापी आंदोलनाची हाक; आंदोलन शांततापूर्ण मार्गाने करण्याचे आवाहन
- NEET Protest : मोदी-शहांचा कट्टर समर्थकच सरकारविरोधात; ‘विद्यार्थ्यांशी संवादाला उशीर का?’













