Share

Santosh Deshmukh हत्याकांडातील सर्वात मोठी कारवाई! सात जणांवर मोक्का, Walmik Karad चं काय ?

Walmik Karad has been arrested for extortion. Similarly, now a big update has come out regarding him.

by MHD

Published On: 

Walmik Karad Mocca on all accused

Walmik Karad । मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हक्याप्रकरणाने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी संपूर्ण राज्यात मोर्चे काढले जात आहेत. अशातच आता या संदर्भात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.

मागील काही दिवसांपासून या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का (MCOCA charges) लावावा, अशी मागणी केली जात होती. आज अखेर ही मागणी मान्य केली आहे. सुदर्शन घुले,कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, सिद्धार्थ सोनावणे आणि जयराम चाटे या सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे.

MCOCA charges filed in Santosh Deshmukh Case

संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. या आरोपींवर हत्येच्या गुन्ह्यामध्ये एसआयटीने (SIT) मोक्का लावला आहे. एसआयटीच्या या निर्णयामुळे आरोपींना जामीन मिळणे अवघड झाले आहे. पण सध्या वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली असल्याने त्याच्यावर मोक्का लावण्यात आला नाही.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही