Jitendra Awhad । राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे सतत त्यांच्या कोणत्या ना कोणत्या वक्तव्यावरून चर्चेत येत असतात. अशातच आता त्यांनी संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणी संशयित असणाऱ्या वाल्मिक कराडचा (Walmik Karad) साथीदार गोट्या गित्तेवरून (Gotya Gitte) पोलिसांनी एकप्रकारे जणू आव्हान दिले आहे.
“बबन गित्ते यांचे निकटवर्तीय नाथ्रा येथील स्वप्निल पुजारी याच्यावर गोट्या गित्ते आणि गॅंगने १९/१०/२३ रोजी जिवघेणा हल्ला केला होता. धक्कादायक बाब म्हणजे सगळे पुरावे असूनदेखील पोलिसांनी फिर्याद घेतली नाही. मा. न्यायालयाने १५६/३ प्रमाणे गोट्या गित्ते व गॅंगवर ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करूण गोट्या गित्ते आणि गॅंगला अटक करण्याची हिम्मत दाखवावी,” अशा आशयाची पोस्ट एक्सवर जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
Jitendra Awhad on Gotya Gitte
तसेच, त्यांनी काल एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये काही लोकांची टोळी धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) नावाने घोषणा देत काही लोकांना दमदाटी करताना, त्यांना धमाकवताना व मारहाण करताना दिसत आहे. मतदान केंद्र ताब्यात घेऊन धनंजय मुंडे यांना मतदान केल्याचा दावा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :