Sanjay Raut । महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेस या घटक पक्षांचा समावेश आहे. अनेकदा या पक्षांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येतात. अशातच आता महाविकास आघाडीमध्ये फूट पडली आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. कारण ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्वबळावर निवडणुका (Election) लढवण्याची घोषणा केली आहे.
लवकरच मुंबई महापालिका निवडणुका (Mumbai Municipal Elections) पार पडणार आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष आतापासूनच तयारीला लागले आहेत. अशातच आज संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला असता ठाकरे गट सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहे. नागपूरपासून मुंबईपर्यंत आम्ही स्वबळावर (Municipal Elections) लढणार आहे. एकदा आम्हाला पाहायचं आहेच, जे काही होईल ते होईल,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
Sanjay Raut on Mumbai Municipal Elections
मुंबई, ठाणे नागपूरमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना संधी कधी देणार? कार्यकर्त्यांना संधी मिळत नसल्याने याचा पक्षवाढीला फटका बसतो. यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडली की काय? अशा दबक्या आवाजात चर्चा सुरु झाल्या आहेत. संजय राऊत यांच्या निर्णयामुळे आता शरद पवार गट आणि काँग्रेस काय प्रतिक्रिया देतात? हे पाहणे महत्त्वाचे असेल.
महत्त्वाच्या बातम्या :