Suresh Dhas । संतोष देशमुख हत्या प्रकरणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडवर (Walmik Karad) खंडणीचा गुन्हा करण्यात आला आहे. यावरून ते सातत्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.
काल मुंडे यांच्या समर्थकांनी पाटोदा तालुक्यात सुरेश धस यांच्याविरोधात आंदोलन केले होते. सुरेश धस आमच्या मतांवर आमदार झाले आहेत, असा आरोप एका समर्थकाने केला होता. यावर धस यांनी पलटवार करत धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना आव्हान दिलं आहे. (Suresh Dhas vs Dhananjay Munde)
Suresh Dhas on Dhananjay Munde
“मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी आमच्या मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत भीमराव धोंडे यांना मतदान केले. मला मतदान केल्याचा दावा करणाऱ्या कार्यकर्त्याने धनंजय मुंडेंना घेऊन भगवान बाबांच्या समाधीला हात लावून सांगावं की कोणाला मतदान केले आहे,” असं आव्हान धस यांनी दिलं आहे. दरम्यान, धस यांच्या या आव्हानाला धनंजय मुंडे या प्रत्युत्तर देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या :