Santosh Deshmukh । संतोष देशमुख यांच्या हत्या (Santosh Deshmukh murder) प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी राज्यभरातून मोर्चे काढले जात आहेत. यामध्ये देशमुख यांचे कुटुंबीय देखील उपस्थित राहत आहेत. दरम्यान, आज जालन्यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. (Santosh Deshmukh murder case)
या मोर्चादरम्यान पहिल्यांदाच संतोष देशमुख यांच्या मुलांनी त्यांना मोठं होऊन काय व्हायचं आहे? हे सांगितले आहे. “मला डॉक्टर व्हायचं असून ते माझे स्वप्न आहे. माझ्या अभ्यासाचा विचार करायचा झाला तर माझं एक वर्षे बॅक लॉग झालं तर ते मी पुढच्या वर्षी करू शकते. पण माझ्या वडिलांचे बलिदान मला व्यर्थ जाऊ द्यायचं नाही,” असे वैभवी देशमुखने (Vaibhav Deshmukh) सांगितले.
Santosh Deshmukh child future study plan
तर विराज देशमुखने मला इंजिनियर व्हायचं आहे, असे सांगितले आहे. या क्रूर हत्याकांडातील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तसेच या प्रकरणी सरकारकडून विविध चौकशी समिती नेमून चौकशी केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या :