Share

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर Ajit Pawar स्पष्टच बोलले; म्हणाले, “दोषी असतील तर त्यांची…”

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर Ajit Pawar स्पष्टच बोलले; म्हणाले, "दोषी असतील तर त्यांची..."

Ajit Pawar । मस्साजोगचे सरंपच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सात आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून कसून चौकशी केली जात आहे. पोलीस चौकशीत दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. या हत्याप्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. (Santosh Deshmukh murder case)

या प्रकरणात वाल्मिक कराडचे नाव वारंवार येत असून ते धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांचे निकटवर्तीय असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता बीड जिल्ह्यातील आमदार, खासदार हे कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा मागत आहेत. यावर अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वरिष्ठ पातळीवर काम करणारे कोणी दोषी असतील तर त्यांची गय करणार नसल्याचं त्यांनी म्हंटल आहे.

Ajit Pawar on Dhananjay Munde Resignation

ते म्हणाले, “या हत्या प्रकरणाचा विविध तपास यंत्रणा तपास करत आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनीही सांगितले आहे, पक्ष वगैरे न बघता यामध्ये वरिष्ठ पातळीवर काम करणारे कोणी दोषी असतील तर त्याच्यावर ताबडतोब कारवाई केली जाईल. अशा प्रकारच्या घटना आम्ही खपवून घेणार नाही”

महत्वाच्या बातम्या :

“या हत्या प्रकरणाचा विविध तपास यंत्रणा तपास करत आहेत. त्याच्यबरोबर मुख्यमंत्र्यांनीही सांगितले आहे, या प्रकरणात कोणी दोषी असल्याचे सिद्ध झाले तर त्याच्यावर ताबडतोब कारवाई केली जाईल. अशा प्रकारच्या घटना आम्ही खपवून घेणार नाही”, असं अजित पवार ( Ajit Pawar ) म्हणालेत.

Maharashtra Marathi News Politics Pune

Join WhatsApp

Join Now