परभणी । मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे हत्याप्रकरण आणि परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryavanshi) यांच्या मृत्यूप्रकरणावरुन जनआक्रोश मोर्चा काढला जात आहे. आज परभणीमध्ये दलित कार्यकर्त्यांनी मोर्चात सहभागी झालेल्या ओबीसी समाजाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांना पँथरकडून चांगलाच इंगा दाखवण्यात आहे.
लक्ष्मण हाके यांचे भाषण थांबून त्यांना तुम्ही चळवळीतील नेते असून तुम्ही खंडणीखोर वाल्मिक कराड यांची बाजू घेता. तुम्ही त्याची बाजू घेऊ नका. नाहीतर आम्ही तुमच्यासोबत नाही. तुम्ही भाजपचे (BJP) हस्तक आहात. तुम्ही आंबेडकरी जनतेची दिशाभूल करत आहात,” असा आरोप आरपीआयचे नेते सचिन खरात (Sachin Kharat) यांनी केला.
Sachin Kharat on Laxman Hake
दरम्यान, भाषण थांबावल्यांनंतर घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. प्रचंड गदारोळानंतर लक्ष्मण हाकेंनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. “मी भाजपचा हस्तक नाही, की त्यांच्या पक्षाचा कार्यकर्ता. मी कोणत्याही आरोपीची बाजू घेतली नाही. त्यांच्यासोबत माझेच फोटो नाहीत”, असा दावा लक्ष्मण हाके यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या :