Share

हा अपघात की घातपात?; अजितदादा भाजप सोडण्याच्या तयारीत होते म्हणून…? अजितदादांच्या मृत्यूनंतर बॅनर्जींचा मोदी सरकारवर भीषण हल्लाबोल!

“अजित पवार भाजप सोडण्याच्या विचारात होते,” असा दावा करत ममता बॅनर्जी यांनी विमान अपघाताच्या सुप्रीम कोर्टामार्फत चौकशीची मागणी केली आहे.

Published On: 

Mamata Banerjee

दिल्ली– राजकारणात अपघाताने मृत्यू होतो की घडवून आणला जातो, हा प्रश्न नेहमीच चर्चिला जातो. पण आता खुद्द ममता बॅनर्जी यांनीच याबाबत शंका उपस्थित केल्याने दिल्लीपासून गल्लीपर्यंत एकच खळबळ उडाली आहे. बारामतीतील विमान अपघातात अजित पवार यांचं निधन झालं, पण त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री Mamata Banerjee यांनी जे वक्तव्य केलंय, त्यामुळे अनेक भुवया उंचावल्या आहेत.

“ते भाजप सोडण्याच्या तयारीत होते?”

ममता बॅनर्जी यांनी पत्रकारांशी बोलताना एक मोठा ‘गौप्यस्फोट’ केला आहे. त्या म्हणाल्या की, “काही दिवसांपूर्वीच मला सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून समजलं होतं की, अजित पवार हे भाजपची साथ (रुलिंग पार्टी) सोडण्याच्या तयारीत होते. आणि आज अचानक त्यांचा असा अंत झाला? मला याबाबत आता सखोल तपासाची गरज वाटते.”. ममता दीदींच्या या विधानामुळे, हा केवळ अपघात आहे की घातपात, अशा चर्चांना उधाण आलं आहे.

Mamata Banerjee demands Supreme Court probe

“एजन्सीज विकल्या गेल्या आहेत, फक्त सुप्रीम कोर्टावर विश्वास”

ममता बॅनर्जी यांनी या अपघाताच्या चौकशीसाठी थेट Supreme Court च्या देखरेखीखालीच तपास झाला पाहिजे, अशी आक्रमक मागणी केली आहे. त्यांनी सरकारी तपास यंत्रणांवरचा विश्वास उडाल्याचं स्पष्ट सांगितलं. त्या म्हणाल्या, “माझा इतर कोणत्याही तपास यंत्रणेवर (Agencies) विश्वास नाही, कारण सर्व एजन्सीज पूर्णपणे ‘विकत’ घेतल्या गेल्या आहेत. फक्त सुप्रीम कोर्टावरच आता आमचा भरोसा उरला आहे.”.

“नेतेही सुरक्षित नाहीत”

देशातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ममता म्हणाल्या की, “जे नेते सत्तेत आहेत, तेच सुरक्षित नाहीत, तर विरोधी पक्षातल्या नेत्यांचं काय होणार? हे देशाचं मोठं नुकसान आहे.”. अजितदादांच्या मृत्यूमागे काही काळंबेरं तर नाही ना? असा संशय निर्माण करणारं हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही