Share

“शब्दांत मांडणं कठीण…” अजितदादांच्या निधनावर अमित शाह भावूक; म्हणाले, हे माझं वैयक्तिक नुकसान!

“अजित पवारांनी ३५ वर्षे महाराष्ट्राची सेवा केली, त्यांचं जाणं हे एनडीए आणि माझं वैयक्तिक नुकसान आहे,” अशी भावूक प्रतिक्रिया अमित शाह यांनी दिली आहे.

Published On: 

amit shah ajit pawar

दिल्ली – राजकारणातली समीकरणं कितीही बदलली तरी माणसांमधले ऋणानुबंध कायम राहतात, याची प्रचिती आज आली. बारामती येथील विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं आणि दिल्लीपासून गल्लीपर्यंत शोककळा पसरली. नेत्यांचे फोन खणखणत आहेत, सोशल मीडियावर श्रद्धांजलीचा पूर आलाय, पण या सगळ्या गोंधळात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अजितदादांना वाहिलेली श्रद्धांजली वाचून अनेकांचे डोळे पानावले आहेत.

नेमकं काय म्हणाले अमित शाह?

अजितदादांच्या कामाचा धडाका आणि स्पष्टवक्तेपणा कोणापासून लपून राहिला नव्हता. याच कामाची पोचपावती देताना अमित शाह यांनी म्हटलंय की, अजित पवार यांनी गेल्या साडेतीन दशकांत महाराष्ट्रातील प्रत्येक घटकाच्या कल्याणासाठी स्वतःला झोकून दिलं होतं. त्यांनी ज्या प्रकारे काम केलं, ते शब्दांत व्यक्त करणं खरंच कठीण आहे.

एनडीएचा आधारवड हरपला!

राज्याच्या राजकारणात अजितदादांची ‘एन्ट्री’ महायुतीमध्ये झाल्यानंतर Amit Shah आणि त्यांच्यात एक वेगळं बॉन्डिंग तयार झालं होतं. त्यामुळेच आजची घटना शाहांसाठी सुद्धा मोठा धक्का आहे. त्यांनी आपल्या शोकसंदेशात स्पष्टपणे म्हटलंय की, “त्यांचे निधन हे केवळ एनडीए परिवाराचे नाही, तर माझे वैयक्तिक नुकसान आहे.”.

या अपघाताचं वृत्त समजताच अमित शाह यांनी तातडीने महाराष्ट्रातील भाजप नेत्यांशी संपर्क साधला. अजितदादांसारखा धडाडीचा नेता अचानक गेल्याने जी पोकळी निर्माण झाली आहे, ती भरून काढणं केवळ अशक्य आहे, अशी चर्चा आता दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. एकीकडे सत्तेचं राजकारण सुरू असतानाच काळाने असा घाला घातल्याने सर्वच जण सुन्न झाले आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही