🕒 1 min read
मुंबई – एकीकडे संपूर्ण देश अजितदादांच्या जाण्याने हळहळतोय, तर दुसरीकडे आता या अपघाताबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. बारामतीत नेमकं काय घडलं? हा केवळ अपघात होता की त्यामागे आणखी काही? या चर्चांना उधाण आलं असतानाच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री Mamata Banerjee यांनी थेट चौकशीची मागणी केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
“मला धक्का बसलाय, पण…”
अजित पवार यांच्या निधनाचं वृत्त समजताच ममता बॅनर्जी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, “अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा असा अचानक अंत होणं हे मनाला चटका लावणारं आहे. या भीषण विमान अपघाताच्या बातमीने मी सुन्न झाले आहे.” पण केवळ शोक व्यक्त करून त्या थांबल्या नाहीत.
Mamata Banerjee on Ajit Pawar Plane Crash
ममता बॅनर्जी यांनी शरद पवार आणि पवार कुटुंबीयांचं सांत्वन करतानाच एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट लिहिलंय की, “या घटनेची योग्य आणि सखोल चौकशी झाली पाहिजे” (The incident needs proper investigation). ममता दीदींच्या या मागणीमुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. सामान्यतः अशा अपघातानंतर लगेच चौकशीची मागणी विरोधी पक्षांकडून होत नाही, पण ममता बॅनर्जींच्या या भूमिकेने प्रशासनावर दबाव वाढणार हे नक्की.
नेमकं काय घडलं होतं?
मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांचं खाजगी विमान सकाळी ८ च्या सुमारास मुंबईवरून निघालं होतं. बारामतीजवळ लँडिंगचा प्रयत्न करत असतानाच हा दुर्दैवी अपघात घडला. घटनास्थळी विमानाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला असून आगीचे लोळ बघून स्थानिकांचा थरकाप उडाला. ‘डीजीसीए’ने (DGCA) दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात अजितदादांसह दोन पायलट आणि सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला आहे. एकूण ५ जणांना यात आपले प्राण गमवावे लागले आहेत.
२०२३ मध्ये पक्षात झालेल्या बंडानंतर अजितदादांनी राष्ट्रवादीची सूत्रं हाती घेतली होती, तरीही शरद पवारांशी असलेलं त्यांचं नातं वेगळं होतं. ”शरद पवार आणि अजितदादांच्या सर्व समर्थकांच्या दुःखात मी सहभागी आहे,” असं बॅनर्जीं यांनी म्हटलं आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- “शब्दांत मांडणं कठीण…” अजितदादांच्या निधनावर अमित शाह भावूक; म्हणाले, हे माझं वैयक्तिक नुकसान!
- “आज पुन्हा पोरका झालो…” अजितदादांच्या निधनानंतर धनंजय मुंडे ढसाढसा रडले; म्हणाले, “असं वाटतंय की आता फोन येईल…”
- बारामतीत झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन; महाराष्ट्रावर शोककळा.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











