Share

“वाल्मिक कराड प्रकरणात ईडी कारवाई…”; Supriya Sule यांचा परखड सवाल

"वाल्मिक कराड प्रकरणात ईडी कारवाई..."; Supriya Sule यांचा परखड सवाल

Supriya Sule | बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. ९ डिसेंबरला आधी त्यांचं अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना अत्यंत क्रूरपणे ठार करण्यात आलं. या हत्याप्रकरणावरुन राज्यभरातील वातावरण प्रचंड तापले आहे. राज्यातील सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

या प्रकरणात वाल्मिक कराड ( Walmik Karad ) हाच मास्टर माईंड आहे, असा आरोप केला जात आहे. मात्र वाल्मिक कराडवर फक्त हेच आरोप होत नसून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर आठ महिन्यांपूर्वी आर्थिक गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर येतेय. याबाबत सुप्रिया सुळे यांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत.

Supriya Sule On Walmik Karad

एकीकडे पुरावे नसताना अनिल देशमुख आणि संजय राऊत यांच्यावर ईडीची कारवाई झाली होती, परंतु वाल्मिक कराड यांच्याविरोधात गुन्हा दाखल असताना कारवाई का नाही? असा प्रश्न सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी उपस्थित केला आहे. वाल्मिक कराडवर अंमलबजावणी संचालनालय (ed) आणि पीएमएलए (Prevention of Money Laundering Act) नुसार कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र गुन्हा दाखल होऊन आठ महिने झाले तरी त्यांच्यावर कारवाई नसल्याचं सुळे यावेळी बोलताना म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या :

एकीकडे पुरावे नसताना अनिल देशमुख आणि संजय राऊत यांच्यावर ईडीची कारवाई झाली होती, परंतु वाल्मिक कराड यांच्याविरोधात गुन्हा दाखल असताना कारवाई का नाही? असा प्रश्न सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी उपस्थित केला आहे.

Marathi News

Join WhatsApp

Join Now