🕒 1 min read
Walmik Karad । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणी सध्या मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि खून प्रकरणी अटकेत असणाऱ्या वाल्मिक कराडच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी याप्रकरणी आक्रमक भूमिका घेत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अशातच आता एक खळबळजनक माहिती समोर आली आहे.
बीडमध्ये धनंजय मुंडे यांच्या शिफारसीवरून वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष बनवले आहे. अजूनही तो या योजनेचा अध्यक्ष आहे. धक्कादायक बाब म्हणजे वाल्मिक कराडवर तब्बल 14 गुन्हे असूनही मुंडे यांनी त्याच्या नावाची शिफारस केली होती. यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढू शकतात.
हे प्रकरण समोर आल्याने आता एकच खळबळ उडाली आहे. विरोधक आता पुन्हा एकदा याच मुद्द्याला धरून धनंजय मुंडे आणि राज्य सरकारला घेराव घालू शकतात.यावर आता धनंजय मुंडे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :
- ठाकरे गट सत्तेत सहभागी होणार? Aditya Thackeray यांनी सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्र्याची भेट घेतल्याने खळबळ
- देशमुख हत्येवरून Ambadas Danve यांची सरकारवर आगपाखड; म्हणाले, “२३ वर्षाचा एक पोऱ्या…”
- Hair Loss । बुलढाण्यातील लोकांना टक्कल का पडला? कारण जाणून व्हाल हैराण, तुम्ही करत नाही ना ‘ही’ चूक?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








