Share

देशमुख हत्येवरून Ambadas Danve यांची सरकारवर आगपाखड; म्हणाले, “२३ वर्षाचा एक पोऱ्या…”

देशमुख हत्येवरून Ambadas Danve यांची सरकारवर आगपाखड; म्हणाले, "२३ वर्षाचा एक पोऱ्या..."

Ambadas Danve । डिसेंबर महिन्यात बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही या प्रकरणावरुन हिवाळी अधिवेशनात निवेदन दिलं.

७ जानेवारीला संतोष देशमुख यांच्या कुटुंबाने देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. कुणालाही सोडणार नाही असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीत दिलं. यावरून अंबादास दानवे ( Ambadas Danve ) यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

जयराम माणिक चाटे, महेश सखाराम केदार, प्रतिक घुले, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि  विष्णू चाटे या आरोपींना गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. मात्र आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला महिना उलटला तरी आंधळे अजून पोलिसांच्या हाती न लागल्याने अंबादास दानवे ( Ambadas Danve ) यांनी सरकारला जाब विचारला आहे.

“केवळ २३ वर्षे वयाचा एक पोऱ्या, कृष्णा आंधळे हा सहावा आरोपी पोलिसांच्या हाती तुरी देतोय. दुसरीकडे जनभावनेचा आदर म्हणून सरकार धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला तयार नाही. किती हा निगरगट्टपणा. ‘निगरगट्ट’ शब्द पण लाजवला यांनी आता तर!”, असं ट्विट करत त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय.

“देवेंद्र फडणवीस म्हणतात आम्ही कोणाला सोडणार नाही, महोदय, सोडणे वगैरे नंतर, अगोदर आरोपी धरा तर!”, असं म्हणत अंबादास दानवे ( Ambadas Danve ) यांनी फडणवीसांना टोला लागवला आहे.

महत्वाच्या बातम्या :

“देवेंद्र फडणवीस म्हणतात आम्ही कोणाला सोडणार नाही, महोदय, सोडणे वगैरे नंतर, अगोदर आरोपी धरा तर!”, असं म्हणत अंबादास दानवे ( Ambadas Danve ) यांनी फडणवीसांना टोला लागवला आहे.

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now