Oneplus। भारतात वनप्लस (Oneplus) स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. कंपनी सतत आपले नवनवीन स्मार्टफोन लाँच करत असते. या फोनमध्ये कंपनी धमाकेदार फीचर्स देत असते. अनेकदा हे फोन इतर स्मार्टफोन कंपन्यांना टक्कर देत असते.
अशातच आता कंपनीने आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन्स ‘वनप्लस 13 आणि वनप्लस 13R’ लाँच केले असून हे फोन iPhone ला टक्कर देतात. यात अत्याधुनिक AI फिचर्स, जबरदस्त कॅमेरा सेटअप मिळतो. वनप्लस 13 मध्ये 6.82-इंचाचा 2K 120Hz ProXDR डिस्प्ले मिळतो. तर याची ब्राइटनेस क्षमता 4,500 निट्सपर्यंत जाते. यात Snapdragon 8 Elite चिपसेट, 24GB RAM आणि 1TB पर्यंत स्टोरेज मिळते.
या फोनमध्ये 50MP Sony LYT-808 मुख्य कॅमेरा 50MP 3X पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स (OIS सह) मिळतो. तसेच यात 120-डिग्री अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 32MP फ्रंट कॅमेरा मिळतो. तसेच यात तुम्हाला 6,000mAh बॅटरी पाहायला मिळेल.
किंमतीचा विचार केला तर या फोनच्या किमती 69,999 (12GB/256GB), ₹76,999 (16GB/512GB) आणि ₹89,999 (24GB/1TB) रुपये आहे. या फोनची विक्री 10 जानेवारीपासून सुरू होणार असून ICICI क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांना यावर 5,000 रुपयांची सवलत मिळते.
OnePlus 13R price
वनप्लस 13R
तुम्हाला वनप्लस 13R मध्ये 6.78-इंचाचा 120Hz ProXDR AMOLED डिस्प्ले पाहायला मिळेल. Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर, 16GB RAM आणि 512GB स्टोरेज मिळेल. 13 जानेवारी तुम्हाला हा फोन 42,999 (12GB/256GB) आणि 46,999 (16GB/512GB) रुपयांच्या किमतीत खरेदी करता येतील.
महत्त्वाच्या बातम्या :