Share

सुरेश धसांवरील आरोपांबाबत Amol Mitkari यांची भूमिका ठाम; म्हणाले “आरोप खोटे असतील तर…”

सुरेश धसांवरील आरोपांबाबत Amol Mitkari यांची भूमिका ठाम; म्हणाले "आरोप खोटे असतील तर..."

Amol Mitkari । राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आमदार धस यांच्यावर खंडणी, हत्या, जमिनी बळकावणे यांच्यासारखे गंभीर गुन्हे दाखल असून इतिहासात सुरेश धस हेच आका आहेत, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले.

मात्र अमोल मिटकरींच्या या आरोपावर काही बोलायला सुरेश धस यांनी सर्वात आधी नकार दिला होता. यावर बोलताना राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी आपण बोललेलं खोटं आहे का?, सुरेश धसांनी स्पष्ट करावं असं म्हटलंय. आपले आरोप खोटे असतील तर सुरेश धस त्यावर का बोलत नाही?, असा सवाल त्यांनी केलाय.

दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दोन दिवसांपूर्वी सुरेश धस आणि वाल्मीक कराडला कशासाठी फोन केला होताय?, याचा तपास पोलिसांनी करावा अशी मागणी मिटकरींनी केलीय. धनंजय मुंडेंना मंत्री केल्यामुळेच सुरेश धस यांचा पोटशुळ उठल्याचं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा धस यांना डिवचलं आहे.

अमोल मिटकरींचे आरोप काय?

“संतोष देशमुख यांच्या हत्येच्या (Santosh Deshmukh murder) दोनच दिवसांपूर्वी वाल्मिक कराड आणि सुरेश धस यांच्यात संभाषण झालं होते. त्याचा कथित ऑडिओ पोलिसांकडे असल्याची माहिती आमच्याकडे आहे”, असे आरोप मिटकरी यांनी केलेत.

महत्वाच्या बातम्या :

अमोल मिटकरी ( Amol Mitkari ) यांनी आपण बोललेलं खोटं आहे का?, सुरेश धसांनी स्पष्ट करावं असं म्हटलंय. आपले आरोप खोटे असतील तर सुरेश धस त्यावर का बोलत नाही?, असा सवाल त्यांनी केलाय. 

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now