Online Fraud । हल्ली मोठ्या प्रमाणात ऑनलाईन फसवणूक (Fraud) होत आहे. काही चुकांमुळे अनेकजण आपल्या खात्यातून लाखो रुपयांची रक्कम गमावून बसतात. ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या प्रकाराला काही महत्त्वाच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे, नाहीतर मोठे नुकसान होऊ शकते. (Cyber Fraud)
लाखोंचा फटका बसल्याने अनेकजण टोकाचा निर्णय घेतात. ऑनलाइन फसवणुकीपासून नागरिकांनी सावध राहावं आणि त्यांनी कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. फसवणूक झाल्यास तातडीने जवळच्या सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवावी, असे आवाहन देखील पोलीस करत आहेत.
सायबर गुन्हेगार लोकांना चेतावणी किंवा मोहक संदेश पाठवतात आणि त्यांची फसवणूक करतात. समजा तुम्ही लिंकवर क्लिक करून तुमची क्रेडेन्शियल्स अपडेट केली नाहीत, तर तुम्हाला बँक खाते फ्रीझ अशा समस्याचा सामना करावा लागेल. तर कधी लॉटरी किंवा इतर प्रकारचे बक्षीस जिंकण्याबद्दल संदेश पाठवून फसवतात.
Cyber Crime
लक्षात ठेवा महत्त्वाच्या गोष्टी
- अनधिकृत अॅप्सपासून सतर्क राहा
- व्यक्तिगत माहिती जसे की कोणत्याही अनोळखी व्यक्तीला बँक खाते क्रमांक,ओटीपी किंवा इतर माहिती देणे टाळावे.
- अनोळखी लिंकवर क्लिक करू नये.
- सार्वजनिक नेटवर्कचा वापर करू नये.
- सोशल मीडियावरील जाहिरातींवर विश्वास ठेवणे टाळावे.
महत्त्वाच्या बातम्या :