🕒 1 min read
मुंबई – तुमच्या बँक खात्यातून अचानक पैसे गायब झाले तर? कष्टाचे पैसे गेल्यावर पायाखालची जमीन सरकते ना? आजकाल ऑनलाइन ठगांचा (Online Fraud) सुळसुळाट इतका वाढलाय की, कुणाचे पैसे कधी चोरांच्या खिशात जातील सांगता येत नाही. पण आता घाबरून जाण्याचं कारण नाही. तुमच्यासोबत असा काही ‘स्कॅम’ झालाच, तर गेलेले पैसे अवघ्या 24 तासांत परत मिळू शकतात. कसं? तेच आज आपण पाहणार आहोत.
नेमकं काय करायचं?
केंद्र सरकारने सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी एक जबरदस्त यंत्रणा उभी केली आहे. सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये 155260 हा हेल्पलाइन नंबर सेव्ह करून ठेवा. नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलने (National Cyber Crime Reporting Portal) ही सुविधा सुरू केली आहे. जर तुमची फसवणूक झाली, तर क्षणाचाही विलंब न करता या नंबरवर कॉल करा. दिल्ली, राजस्थान, यूपीसारख्या राज्यांत ही सेवा 24 तास सुरू आहे, तर इतर राज्यांत सकाळी 10 ते 6 या वेळेत तुम्ही संपर्क साधू शकता.
Cyber Crime Helpline 155260
ही सिस्टम काम कशी करते…
जेव्हा तुम्ही 155260 वर कॉल करता, तेव्हा तुम्हाला फसवणुकीची वेळ आणि पैसे कुठे ट्रान्स्फर झाले (बँक खाते/E-Wallet) याची माहिती द्यावी लागते. सायबर पोलीस तात्काळ ॲक्शनमध्ये येतात आणि ज्या चोराच्या खात्यात पैसे गेले आहेत, ते खातं ‘गोठवतात’ (Freeze). त्यामुळे त्या ठगाला तुमचे पैसे काढता येत नाहीत किंवा पुढे ट्रान्स्फरही करता येत नाहीत. तुमची तक्रार खरी असल्याची खात्री पटली की, संबंधित बँकेमार्फत तुमचे पैसे तुमच्या खात्यात परत येतात.
यात एक महत्त्वाची अट आहे. जर चोराने पैसे काढून (Cash Withdrawal) घेतले असतील, तर मात्र हे पैसे लगेच मिळत नाहीत. अशा वेळी तुमची तक्रार स्थानिक पोलिसांकडे वर्ग केली जाते आणि नेहमीच्या प्रक्रियेप्रमाणे तपास होतो. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तात्काळ कॉल करणे महत्त्वाचे आहे. मदतीसाठी पोर्टलवर ‘सायबर दोस्त’ (Cyber Dost) हा व्हर्च्युअल असिस्टंटही उपलब्ध आहे.
शेवटी, ‘सावध तोच सुखी’.
अनोळखी लिंकवर क्लिक करणे किंवा ओटीपी शेअर करणे टाळा. तरीही काही गडबड झालीच, तर 155260 हा नंबर तुमच्यासाठी ‘संजीवनी’ ठरू शकतो.
📌 महत्वाच्या बातम्या
- केस गळतीमुळे टक्कल पडण्याची भीती वाटतेय? खोबरेल तेलात मिसळा फक्त ‘ही’ १ गोष्ट
- फडणवीसांचा ‘दणका’ लागताच भाजप-MIM युती तुटली; थेट आमदारालाच नोटीस
- संभाजीनगरात मोठा राडा! भररस्त्यात इम्तियाज जलीलयांच्या गाडीवर हल्ला; जिन्सीमध्ये तणाव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











