Share

केस गळतीमुळे टक्कल पडण्याची भीती वाटतेय? खोबरेल तेलात मिसळा फक्त ‘ही’ १ गोष्ट

Stop hair fall and dandruff instantly by mixing camphor or onion juice with coconut oil. Here is the step-by-step home remedy guide.

Published On: 

Stop hair fall and dandruff instantly by mixing camphor or onion juice with coconut oil. Here is the step-by-step home remedy guide. | Hair Care Tips

Hair Care Tips – कंगव्यात अडकलेले केसांचे पुंजके बघून तुमच्याही काळजाचा ठोका चुकतोय का? सध्याच्या धावपळीच्या जगात, प्रदूषणात आणि स्ट्रेसमुळे वयाच्या विशीतच केस पांढरे होणे किंवा टक्कल पडणे ही आता सामान्य समस्या झाली आहे. बाजारात मिळणारे महागडे शॅम्पू आणि केमिकलयुक्त उत्पादने वापरूनही जर तुमच्या पदरी निराशाच पडत असेल, तर आता काळजी करू नका. कारण, आपल्या स्वयंपाकघरातच लपलेला एक रामबाण उपाय तुमची या कटकटीतून सुटका करू शकतो.

वर्षानुवर्षे आजीच्या बटव्यातून आलेलं खोबरेल तेल केसांसाठी वरदान आहे, हे आपल्याला माहितच आहे. पण थांबा, या तेलाची ताकद दुप्पट करण्यासाठी त्यात एक खास पदार्थ मिसळायचा आहे, आणि तो म्हणजे ‘कापूर’ (Camphor). होय, तोच कापूर जो आपण पूजेसाठी वापरतो!

Hair Care Tips

खोबरेल तेलात कापूर मिसळल्याने त्यातील अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म सक्रिय होतात. यामुळे स्कॅल्पला होणारी खाज, इन्फेक्शन आणि प्रामुख्याने कोंड्याची समस्या (Dandruff) मुळापासून नष्ट होण्यास मदत होते. इतकेच नाही तर, रक्ताभिसरण वाढवून केसांची मुळे पक्की होतात.

हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त २.५ चमचे खोबरेल तेल आणि पाव चमचा कापूर पावडर (किंवा १ छोटी वडी) लागेल.

तेल हलके कोमट करा, त्यात कापूर पावडर विरघळवून घ्या. हे मिश्रण स्कॅल्पवर लावून हलक्या हाताने मालिश करा. ३० ते ६० मिनिटे किंवा रात्रभर तसेच ठेवा आणि सकाळी सौम्य शॅम्पूने धुवा. (टीप: वापरण्यापूर्वी हातावर पॅच टेस्ट नक्की करा.)

जर तुम्हाला कापराचा वापर करायचा नसेल, तर कांद्याचा रस हा दुसरा उत्तम पर्याय आहे. कांद्यातील ‘सल्फर’मुळे कोलेजनचे उत्पादन वाढते आणि नवीन केस येण्यास मदत होते.

प्रमाण: २-३ चमचे खोबरेल तेलात १-२ चमचे कांद्याचा रस मिसळा.

कांद्याचा रस रात्रभर डोक्याला ठेऊ नका. आंघोळीच्या फक्त एक तास आधी हा उपाय करा. थोडक्यात काय, तर केसांचे आरोग्य जपण्यासाठी हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा हा सोपा घरगुती उपाय एकदा नक्की करून पाहा.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही