Suresh Dhas । मागील काही दिवसांपासून मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याप्रकरणावरून सत्ताधाऱ्यांना विरोधकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. अशातच सत्ताधाऱ्यांमध्येही याच मुद्द्याला धरून वाद निर्माण झाले आहेत. आमदार सुरेश धस (Suresh Dhas) आणि संतोष देशमुख खून प्रकरणात अटकेत असणाऱ्या वाल्मिक कराडवर अजित पवार गटाच्या नेत्याने गंभीर आरोप केले आहेत.
“संतोष देशमुख यांच्या हत्येच्या (Santosh Deshmukh murder) दोनच दिवसांपूर्वी वाल्मिक कराड आणि सुरेश धस यांच्यात संभाषण झालं होते. त्याचा कथित ऑडिओ पोलिसांकडे असल्याची माहिती आमच्याकडे आहे. जर वाल्मिक कराडचा खून किंवा खंडणी प्रकरणात दोषी असेल, तर सुरेश धस यांची चौकशीही करायला पाहिजे”, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.
Suresh Dhas on Ajit Pawar group
अमोल मिटकरी यांनी केलेल्या टिकेनंतर सुरेश धसांनी मोठे विधान केले. अमोल मिटकरी, सुरज चव्हाण हे पहिली दुसरीतील मुले आहेत. याअगोदरही दोन चार वेळा मी अमोल मिटकरीला समजावले असल्याचे धसांनी म्हटले. मिटकरी हा स्वत: बोलत नाहीये. मिटकरीला कोणीतरी बोलायला लावतंय. माझे म्हणणे आहे की, जो कोणी मिटकरीला बोलायला लावतंय, त्याने पुढे यावे. मी त्याला चांगले उत्तर देईल, असं धस म्हणालेत.
“राष्ट्रवादीत एक वरिष्ठ मुन्नी आहे. राष्ट्रवादीत एक बडी मुन्नी आहे आणि त्या मुन्नीला म्हणा…तू इथे ये…कुठे मिटकरी, सुरज चव्हाण या लहान पोरांना कशाला बोलायला लावते. मला माहितीये आणि मुन्नीला पण माहितीये मी कोणाबद्दल बोलत आहे. त्या मुन्नीने पुढे यावं. मुन्नी पुढे आल्यावर मी सुन्नी करतो”, असं वक्तव्य धस यांनी केलंय. अखेर राष्ट्रवादीमध्ये ही मुन्नी कोण आहे, जिच्याबद्दल सुरेश धस बोलत होते, याबद्दल जोरदार चर्चा ही रंगताना दिसतेय.
महत्वाच्या बातम्या :
- Pune Crime | पुण्यातील धक्कादायक प्रकार! शाळेतल्या शिपायानं केलं विद्यार्थिनींच्या चेंजिंग रूममधील व्हिडिओ रेकॉर्डिंग, अन…
- “बीड हत्याकांडापूर्वी Suresh Dhas आणि Walmik Karad संपर्कात”; राष्ट्रवादीच्या बॉम्बने उडाली खळबळ
- घर खरेदीचं स्वप्न होईल पूर्ण! CIDCO ने जाहीर केल्या घरांच्या किंमती, पण अर्जाची शेवटची मुदत कधीपर्यंत?