Walmik Karad । मागील काही दिवसांपासून मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याप्रकरणावरून सत्ताधाऱ्यांना विरोधकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. अशातच सत्ताधाऱ्यांमध्येही याच मुद्द्याला धरून वाद निर्माण झाले आहेत. आमदार सुरेश धस (Suresh Dhas) आणि संतोष देशमुख खून प्रकरणात अटकेत असणाऱ्या वाल्मिक कराडवर अजित पवार गट नेत्याने गंभीर आरोप केले आहेत.
“संतोष देशमुख यांच्या हत्येच्या (Santosh Deshmukh murder) दोनच दिवसांपूर्वी वाल्मिक कराड आणि सुरेश धस यांच्यात संभाषण झालं होते. त्याचा कथित ऑडिओ पोलिसांकडे असल्याची माहिती आमच्याकडे आहे. जर वाल्मिक कराडचा खून किंवा खंडणी प्रकरणात दोषी असेल, तर सुरेश धस यांची चौकशीही करायला पाहिजे”, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.
पुढे त्यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या मागणीवरून देखील भाष्य केले आहे. “पक्ष धनंजय मुंडे यांच्या पाठिशी असून जोपर्यंत त्यांच्यावरील आरोप सिद्ध होत नाही, तोपर्यंत पक्ष त्यांचा राजीनामा घेणार नाही. या प्रकरणातील दोषींना फाशी झाली पाहिजे, ही धनंजय मुंडे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
Amol Mitkari on Suresh Dhas & Walmik Karad
त्यामुळे आता राज्यात मिटकरी विरुद्ध धस (Amol Mitkari vs Suresh Dhas ) असा नवा वाद पाहायला मिळू शकते. तर दुसरीकडे या आरोपांवर आता सुरेश धस कोणती प्रतिक्रिया देतात? हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :