Share

Harshada Sanjay Shirsat । मंत्री संजय शिरसाटांच्या कन्येचा महाप्रताप; सरकारी अधिकारी घेऊन…

A shocking fact has come to light that Harshada Shirsat inspected the CIDCO area in Golwadi, Tisgaon and Vadgaon areas of Chhatrapati Sambhajinagar West Constituency along with the concerned officials without any post.

by MHD

Published On: 

Harshada Sanjay Shirsat । मंत्री संजय शिरसाटांच्या कन्येचा महाप्रताप; सरकारी अधिकारी घेऊन…

Harshada Sanjay Shirsat । मागील काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधक सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून आमनेसामने येत आहेत. यामुळे राज्याचे राजकारण वेगळे वळण घेत आहे. सत्ताधारी त्यांच्या पदाचा दुरुपयोग करतात, असा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जातो. याचीच प्रचिती सध्या पाहायला मिळत आहे.

सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) हे सतत त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. तर आता त्यांची कन्या हर्षदा शिरसाट या देखील चर्चेत आल्या आहेत, पण त्याला एक वेगळेच कारण आहे. कोणतेही पद नसताना हर्षदा यांनी छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) पश्चिम मतदार संघातील गोलवाडी, तिसगाव आणि वडगाव परिसरातील सिडको (CIDCO) भागाची संबधित अधिकाऱ्यांसह पाहणी केली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

हाती कोणतेही पद नसताना त्यांनी सिडकोच्या माध्यमातून करण्यात येत असणाऱ्या विकास कामांचा आढावा घेतल्याने आता त्यांच्या या कृतीवर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे संजय शिरसाट यांच्याकडे सिडको अध्यक्षपद देखील आहे. संजय शिरसाट उपस्थित नसताना कोणत्या अधिकारात सिडकोचे अधिकारी हे हर्षदा शिरसाट यांच्या सोबत पाहणी करत आहेत? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

राज्यात आधीपासून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा संघर्ष सुरु असताना हर्षदा शिरसाट यांनी परस्पर सिडकोच्या माध्यमातून करण्यात येत असणाऱ्या विकास कामांचा आढावा घेतल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर आता सत्ताधाऱ्यांसह संजय शिरसाट काय निर्णय घेतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Harshada sanjay shirsath fb post
Harshada sanjay shirsath fb post

“छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदार संघातील गोलवाडी, तिसगाव, वडगाव परिसरातील सिडको भागाची संबधित अधिकाऱ्यांसह पाहणी केली. तसेच सिडकोच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला,” अशा आशयाची पोस्ट हर्षदा शिरसाट यांनी केली होती.

Harshada Sanjay Shirsat CIDCO inspection

चूक लक्षात आल्यावर हर्षदा यांनी फेसबुक वरील पोस्ट डिलीट केली आहे. पण त्यानिमिताने सरकारी अधिकारी आणि सरकारी वाहने मंत्र्यांच्या कुटूंबियांच्या दिमतीला असतात का? तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी हेच अधिकारी, मंत्री कुठे असतात? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही