Sunil Tatkare | राज्यात नुकतंच महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) असे दोन गट पडले. अशातच आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार का?, असा प्रश्न विचारला जात आहे.
कारण दोन राष्ट्रवादी एकत्र होण्याच्या आशा व्यक्त होत असतानाच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवारांच्या पक्षाला पुन्हा एकदा सुरुंग लावण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तब्बल सात खासदारांना संपर्क साधल्याची माहिती आहे.
सुनील तटकरेंनी (Sunil Tatkare) सात खासदारांची भेट घेवून त्यांना सत्तेत सोबत येण्याची ऑफर देखील दिल्याची माहिती आहे. दरम्यान संपर्क झालेल्या सातही खासदारांनी सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांची ऑफर नाकारली आहे.
यानंतर सुप्रिया सुळेंनी प्रफुल पटेल यांना फोन करुन सुनिल तटकरेंबद्दल नाराजी व्यक्त केली. पुन्हा तुम्ही आमचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न करत आहात का?, असा संतप्त सवाल त्यांनी केला असल्याची माहिती समोर येतेय.
महत्वाच्या बातम्या :
‘कोण आफ्रिदी? कोणत्या जोकरचं नाव घेता…’, शाहिद आफ्रिदीचं नाव घेताच असदुद्दीन ओवैसी भडकले