Sharad Pawar । मागील काही दिवसांपासून राज्याचं नाव मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणामुळे चांगलेच चर्चेत येत आहे. अनेक राजकीय नेत्यांनी यात आक्रमक भूमिका घेतली आहे. तर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे.
शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी फोनवरून चर्चा केली असल्याची माहिती समोर आली आहे. “संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा होण्यासाठी पोलीस प्रशासनाला तपासाबाबत आदेश द्यावेत. तसेच बीडसह राज्यातील विविध ठिकाणी उद्योगांना खंडणी मागणाऱ्यांवर कारवाई करावी”, अशी मागणी शरद पवारांनी केली आहे.
दरम्यान, नुकतेच बीड प्रकरणात जे लोकप्रतिनिधी आवाज उठवत आहेत, त्या लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेचा आढावा घेऊन त्यांना सुरक्षा पुरवावी, अशी मागणी करणारं पत्र देखील त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं होतं. या पत्रानंतर आता शरद पवार यांनी फोनवरून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे.
Sharad Pawar on Santosh Deshmukh
तसेच शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर (Uttamrao Jankar) यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर सडकून टीका केली आहे. मात्र टीका करत असताना जानकर यांची जीभ घसरली आहे. धनंजय मुंडे म्हणजे पुरुष वेश्या असल्याचा गंभीर आरोप जानकर यांनी केला आहे. यामुळे पुन्हा एकदा राज्याचे राजकारण तापू शकते.
महत्त्वाच्या बातम्या :