Share

मोठी बातमी । खंडणीखोर Walmik Karad ला लवकरच जामीन मिळेल?

Walmik Karad Granted Bail Soon । Santosh Deshmukh | Dhananjay Munde

Walmik Karad Vs Santosh Deshmukh | मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता महिना होत आला आहे.  हत्याप्रकरणावरुन ( Santosh deshmukh murder case ) राज्यभरातील वातावरण प्रचंड तापले आहे. सर्व आरोपी पकडले जावेत आणि त्यांना कडक शिक्षा व्हावी यासाठी अनेक मोर्चे आणि आंदोलनं सुरु आहेत.

या प्रकरणात वाल्मिक कराड हाच मास्टर माईंड आहे, असा आरोप सुरेश धस यांनी केला आहे. तसंच वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा खास माणूस आहे, त्यामुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत असताना, धनंजय मुंडेंनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे.

मस्साजोगचे ग्रामस्थ अत्यंत दहशतीत आहेत. ग्रामस्थ म्हणतायेत सरकारला जमत नसेल तर सरकारने गावाला लाकडं पाठवून द्यावी. आम्ही सगळे जळून घेतो. असंही कराड सुटून आल्यावर आम्हाला मारणारच असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे.

Walmik Karad Granted Bail Soon । Santosh Deshmukh | Dhananjay Munde

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते भैया पाटील ( Bhaiya Patil) यांनी यासंदर्भात खळबळजनक दावा केला आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणी तपासात वाल्मिक कराडला सीआयडीकडून व्हीआयपी वागणूक दिली जात आहे. तसेच पोलिसांवर सत्ताधारी मंत्री दबाव टाकत असल्याचं देखील भैय्या पाटील यांनी म्हंटल आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास २% पण पुढे गेला नाही. वाल्मिकला पुढच्या सुनावणीत जामीन मिळेल अशे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. १४ तारखेला टायगर इज बॅक, बाप तो बाप रहेगा स्टेट्स सोबत जेसीबीने वाल्मिकचे सत्कार पाहायला तयार रहा. १४ तारखेला Walmik Karad ला जामीन मंजूर होईल, असा दावा भैय्या पाटील यांनी केला आहे.

तसेच, हत्या प्रकरणात वाल्मीक कराड चा समावेश 302 आणि मोक्कामध्ये न करण्यासाठी सीआयडी तसेच तेथील पोलिसांवर मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा फार दबाव आहे. त्या दबावापोटीच सीआयडी तसा तपास करत आहे. सीआयडीने कोर्टात फक्त विष्णू चाटेच याचा प्रमुख आहे असे सांगून वाल्मीक ला वाचवले तर नवल वाटू देऊ नका, असे देखील पाटील म्हणाले आहेत.

बीडची गुन्हेगारी वाढवण्यासाठी, बीडचा जो बिहार झालाय त्याला बीडचे पोलीस जबाबदार आहेत. ते निपक्ष काम किंवा निपक्ष चौकशी करूच शकत नाहीत. बीडमध्ये गुन्हेगारांच्या सोबत बीडच्या पोलिसाच्या चौकश्या करा. बीड येथील पोलीस हे पगारी जरी महाराष्ट्र शासनाचे असले तरी ते काम वाल्मिक व मुंडेच्या दरबारात करतात.

महत्वाच्या बातम्या

१४ तारखेला टायगर इज बॅक, बाप तो बाप रहेगा स्टेट्स सोबत जेसीबीने वाल्मिकचे सत्कार पाहायला तयार रहा. १४ तारखेला Walmik Karad ला जामीन मंजूर होईल, असा दावा भैय्या पाटील यांनी केला आहे.

Crime India Maharashtra Marathi News Mumbai Politics Pune

Join WhatsApp

Join Now