Share

“वाल्मिक कराड चोरांचा, दरोडेखोरांचा साथीदार”; Suresh Dhas यांचे गंभीर आरोप 

"वाल्मिक कराड चोरांचा, दरोडेखोरांचा साथीदार"; Suresh Dhas यांचे गंभीर आरोप 

Suresh Dhas | संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराडवर थेट आरोप केले आहेत. त्याचसोबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके, शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर, खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी वाल्मिक कराड हाच यामागे असल्याचा आरोप केला.

यामुळे आता धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशीही मागणी जोर धरू लागली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आमदार सुरेश धस यांनी आज देवगिरी बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.

Suresh Dhas on Walmik Karad 

या भेटीनंतर वाल्मिक कराडवर त्यांनी वसुलीचा आरोप केला. वाल्मिक कराडने एका स्टेट को ऑपरेटिव्ह बँकेला दमबाजी करुन त्यांच्याकडून 2 कोटी रुपयांची डिफेंडर गाडी घेतली, असा गंभीर आरोप सुरेश धस ( Suresh Dhas ) यांनी केला.

सुरेश धस म्हणाले, “यांचे वेगवेगळे धंदे आहेत. वसुलीच्या या जेवढ्या गँग्स आहेत, त्यांना मोक्का लावला पाहिजे, नाहीतर, जे तिहार जेलमध्ये होतेय ते भविष्यात अगदी मुंबईच्या सलमान खानपर्यंत जे येतय तसा काहीसा प्रकार या गँग्सकडून होऊ शकतो.”

महत्वाच्या बातम्या :

वाल्मिक कराडने एका स्टेट को ऑपरेटिव्ह बँकेला दमबाजी करुन त्यांच्याकडून 2 कोटी रुपयांची डिफेंडर गाडी घेतली, असा गंभीर आरोप सुरेश धस ( Suresh Dhas ) यांनी केला.

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now