🕒 1 min read
Karuna Munde | मुंबई सत्र न्यायालयाने गेल्या सुनावणीत करुणा मुंडे यांना धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची पत्नी ठरवत महिन्याला 2 लाख रुपयांची पोटगी देण्याचे निर्देश दिले होते. मात्र, करुणा मुंडे (Karuna Munde) यांनी आपल्याला महिन्याला 15 लाख रुपयांची पोटगी हवी असल्याची मागणी केली होती. यानंतर धनंजय मुंडे यांनी आपण करुणा मुंडे यांच्याशी लग्न केल्याचा दावा फेटाळला.
धनंजय मुंडे यांनी या सर्व दाव्याला विरोध करत ‘करुणा शर्मा पत्नी नव्हत्या, ते दोघं केवळ लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते’, असं कोर्टात सांगितलं. करुणा करुणा मुंडे यांच्याकडे वैध विवाहाचे प्रमाणपत्र नाही. त्यामुळे त्यांना पत्नी म्हणता येणार नाही, असं धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे वकील युक्तीवाद करताना म्हणाले.
Karuna Munde Made Allegations Against Dhananjay Munde
यानंतर करुणा शर्मा यांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे माझगाव कोर्टाने धनंजय मुंडेंची याचिका फेटाळत करुणा मुंडे यांच्या बाजूने निकाल दिला आहे. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना करुणा मुंडे (Karuna Munde) यांनी गंभीर आरोप केले आहेत.
“धनंजय मुंडे यांच्या विरोधात बोलल्यास माझ्या मुलीला उचलून नेण्याची धमकी दिली जात आहे”, असा आरोप करुणा मुंडे यांनी केला आहे. “शिवानीला उचलून नेण्याची धमकी मला त्यांचे लोक देत आहेत. मी या प्रकरणात तक्रारही केली आहे. मी तक्रार करून पाच ते सहा दिवस झाले आहेत. व्हॉटसअपवर मला धमकी दिली जात आहे”, अशी माहिती करुणा मुंडे यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या :
- “…तोपर्यंत त्यांचं मुख्यमंत्रिपद जाईल”; पुण्यातील घटनेवरून Sanjay Raut यांची फडणवीसांवर टीका
- गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी Devendra Fadanvis यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “सगळी चूक रुग्णालयाची…”
- “गल्ली गल्लीमध्ये राज ठाकरेंच्या पक्षासारखे..”; Gunratna Sadavarte यांची बोचरी टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











