Share

“गल्ली गल्लीमध्ये राज ठाकरेंच्या पक्षासारखे..”; Gunratna Sadavarte यांची बोचरी टीका

Gunratna Sadavarte has criticized Raj Thackeray, saying that there are parties like Raj Thackeray’s party in every street.

Published On: 

Gunratna Sadavarte Criticized MNS Raj Thackeray 

Gunratna Sadavarte । गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठी भाषेचा मुद्दा उपस्थित केला होता. बँक आणि इतर अस्थापनांमध्ये मराठी भाषेचा वापर होतो की नाही हे जाऊन तपासा असे आदेश राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले होते. त्यानंतर एका बँक कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची घटना देखील समोर आली होती. यावर प्रतिक्रिया देताना वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

Gunratna Sadavarte Criticized Raj Thackeray 

गल्ली गल्लीमध्ये राज ठाकरेंच्या पक्षासारख्या पार्ट्या आहेत, असं म्हणत गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी राज ठाकरे यांना डिवचलं आहे. “व्यवसाय करताना कोणालाही सक्ती करता येऊ शकत नाही, राईट टू स्पीच ॲंड एक्सप्रेशन समजून घ्यावं, संविधानाला तडा जाऊ नये, राज ठाकरे यांनी अभ्यास करावा”, असा सल्लाही सदावर्ते यांनी ठाकरेंना दिला आहे. त्याचबरोबर राज ठाकरे आणि उदय सामंत (Uday Samant) यांच्या भेटीवर देखील सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली.

“राज ठाकरे संसदेतील आकड्यांसंदर्भात देखील झिरो आहेत,  उदय सामंत यांची एक ख्याती आहे, त्यांच्या हातात भरभरून लक्ष्मी असते,  कोणी सुद्धा प्रसन्न होईल, राज ठाकरे प्रसन्न झाले ना? माझे पण आवडीचे आहेत ते, आमची देखील त्यांच्याशी मन की बात होते”, असं म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. यावर आता राज ठाकरे काय प्रत्युत्तर देतात का?, हे पाहावं लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही