Rupali Chakankar | भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक असलेले सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा सुशांत भिसे यांचा मृत्यू झाला. प्रसूतीसाठी आलेल्या तनिषा भिसे (Tanisha Bhise) यांच्या कुटुंबाकडे दहा लाख रुपयांची मागणी करण्यात आली. पैसे न भरल्यानं या महिलेला रुग्णालयात दाखल करून घेतलं नाही. योग्यवेळी उपचार न मिळाल्यानं या महिलेचा मृत्यू झाला, असा आरोप रुग्णालयावर करण्यात येत आहे.
Rupali Chakankar Reaction On Deenanath Mangeshkar Woman Death
या घटनेनंतर राज्यभरातून निषेध व्यक्त केला जात असून मंगेशकर रुग्णालयाचे प्रशासन अडचणीत सापडलं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी “दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या चौकशी समितीचा अहवाल म्हणजे, “स्वत:लाच क्लिन चिट देण्याचा प्रयत्न, त्याला महत्त्व नाही”, असे म्हटले आहे. या प्रकरणातील पीडितेच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीच्या अधारे संपूर्ण चौकशी केली जाणार असल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी दिलीय.
रुग्णालयाच्या अहवालात काय म्हंटलंय?
महिला रुग्णासाठी ट्विंस प्रेग्नंसी धोकादायक होती. रुग्ण पहिले सहा महिने तपासणीसाठी रुग्णालयात आलाच नाही. रुग्णाच्या मृत्यूमुळे आलेली निराशा आणि अॅडव्हान्स मागितल्याच्या रागातून दिशाभूल करणारी तक्रार केली गेली, असे रुग्णालयाच्या अहवालात म्हटले गेले आहे. कमी वजनाची ७ महिन्याची जुळी मुलं, जुन्या आजाराची गुंतागुंत आणि कमीत कमी दोन ते अडीच महिने NICU चे उपचार लागतील हे समजावून सांगण्यात आले होते. १० ते २० लाख खर्च येऊ शकतो याची कल्पना देण्यात आली होती.
महत्वाच्या बातम्या :