Share

दिपाली सय्यद बनल्या रुपाली चाकणकर, फर्स्ट लूक आला समोर; पण ‘भोंदू खरात’ कोण?

बहुचर्चित ‘महाराष्ट्राची एप्स्टिन फाईल’ चित्रपटात अभिनेत्री दिपाली सय्यद रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत झळकणार आहेत. त्यांचा हुबेहूब फर्स्ट लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

Published On: 

Deepali Sayed First Look - Actress Deepali Sayed playing Rupali Chakankar in Marathi movie.

महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या घटनांवर थेट सिनेमा येतोय, हे तुम्हाला माहितीये का? सध्या ‘महाराष्ट्राची एप्स्टिन फाईल’ या आगामी मराठी चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली असून, आता यातल्या एका महत्त्वाच्या भूमिकेचा चेहरा समोर आला आहे.

या बहुचर्चित चित्रपटात अभिनेत्री दिपाली सय्यद (Deepali Sayed) चक्क रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. सध्या मुंबईत या चित्रपटाचं शूटिंग वेगाने सुरू असून, सेटवरचे काही फोटो आता समोर आले आहेत. यात दिपाली सय्यद यांचा हुबेहूब चाकणकरांसारखा लूक पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Deepali Sayed In Marathi Movie

नुकताच या भूमिकेचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. दिपाली सय्यद यांची वेशभूषा, साडी नेसण्याची पद्धत आणि देहबोली अगदी रुपाली चाकणकर यांच्याशी मिळतीजुळती असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या या फोटोंनी चांगलीच हवा केली आहे.

चित्रपटाच्या मूळ कथेबाबत निर्मात्यांनी कमालीची गुप्तता पाळली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सिनेमा महाराष्ट्रातील काही मोठ्या आणि वादग्रस्त घटनांवर भाष्य करणार आहे. त्यामुळे सिनेमाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये प्रचंड कुतूहल पाहायला मिळतंय.

दुसरीकडे, या चित्रपटातील आणखी एका पात्रावरून सस्पेन्स वाढला आहे. चित्रपटात ‘भोंदू खरात’ हे अत्यंत चर्चेत असलेलं पात्र नेमकं कोणता अभिनेता साकारणार, हे अद्याप गुलदस्त्यातच ठेवण्यात आलं आहे. निर्मात्यांनी याबाबत अत्यंत गोपनीयता बाळगली असून, अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. याबाबत अधिक माहिती हाती आल्यावर बातमी अपडेट केली जाईल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही