काँग्रेस नेत्या संगीता तिवारी (Sangeeta Tiwari) यांनी रूपाली चाकणकरांवर (Rupali Chakankar) हॉटेल आणि आर्थिक व्यवहारांच्या मुद्द्यावरून गंभीर आरोप करत जोरदार टीका केली. 60-70 कोटींच्या निधीचा स्रोत आणि हॉटेलच्या भागीदारीवरून तिवारी यांनी सवाल उपस्थित केले आहेत.
संगीता तिवारी म्हणाल्या की, “सहा महिन्यानंतर समजलं का लज्जा उत्पन्न झाली. सहा महिने लज्जा नव्हती का? माणसाने किती निर्लज्ज असावं. मला नाही अब्रू आणि मी कशाला घाबरू अशी अवस्था रूपाली चाकणकरांची झाली आहे.”
Sangeeta Tiwari on Rupali Chakankar
“स्वतःचं कमबॅक करण्यासाठी एका नेत्याने सांगितले, त्यासाठी तुम्ही बाकीच्या लोकांना त्रास देत आहेत. गुन्हा दाखल होऊ शकत नाही. सोशल मीडियावरील पोस्ट पहा किती घाण कमेंट्स केलेले आहेत, मग त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करा. तुम्ही गुन्हेगार नव्हत्या तर तुमचा राजीनामा का घेतला? तुम्ही गुन्हेगार होता म्हणून राजीनामा दिला. ही बाई अतिशय खोटारडी आहे.” असा आरोप संगीता तिवारी यांनी चाकणकर यांच्यावर केला आहे.
पुढे त्या म्हणाल्या की, “2012 प्रतिज्ञापत्र पाहिले तर आणि आजच्या दिवशी साठ कोटींचे पब, डान्स बार, रेस्टॉरंट आहेत. माहिती अधिकारात आम्ही माहिती घेत आहोत, हा पब आहे डान्सबार आहे का बार? आधी नाशिकमध्ये बायकांच वाटोळ केलं, पुणे सांस्कृतिक शहर आहे, आता आमच्या मुलांचं वाटोळ करणार का? तिथं तुम्ही दारू देणार, हुक्का देणार, पोरी देणार,”
“तुमचा पार्टनर कोण आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतून हाकलून दिलेला महेश शेट्टी याला तुम्ही पुण्यात प्रवेश देणार. हॉटेलला अंडरवर्ल्डचा मुजावर हा सुरक्षा देणार. एकंदरीत पहिल्यांदा महिला टार्गेट केल्या, त्यांचं वाटोळं केलं, त्या महिलांवर तुम्ही पैसे कमावले, ते हॉटेलमध्ये लावताय का? पुण्याची संस्कृती आणि मुलांना खराब करायचा कार्यक्रम ठेवला आहे का?” असा सवाल संगीता तिवारी यांनी उपस्थित केला आहे.
महत्त्वाचं एवढे 60 ते 70 कोटी आले कुठून? आम्ही त्यांचा प्रवास माहितीच्या अधिकारात आम्ही महसूल पोलीस प्रशासनाकडून माहिती घेणार. रूपाली चाकणकरांना जागा देणारा भाजपचा माणूस आहे. पैसे कमवण्यासाठी तुम्ही पुण्याचं वाटोळ करायला निघालात का? असा देखील सवाल त्यांनी केला.
संगीता तिवारी म्हणाल्या की “कल्याणी नगर सारख्या भागात 20 हजार चौरस फूट एवढं मोठं हॉटेल बांधलं तुम्ही अचमबीत व्हाल. जरी भाजपच्या माजी आमदाराच्या भावाने ही जागा त्यांना भाडेतत्त्वावर दिली असली तरी कुठेतरी पार्टनर इन क्राईम आहेस ना.”
“उद्घाटनासाठी जयंत पाटील येतात, ज्यांनी घरातलं पाणी दिलं होतं, ते रूपाली चाकणकरांच्या हॉटेलच्या उद्घाटनासाठी येतात, आणखी बरेच जण आहेत. ह्या नेत्यांच्या बायकांना कळत नाही का ही बाई अशी आहे? तुम्ही का गेलात उद्घाटनासाठी विचारले पाहिजे बायकांनी… चाकणकर बाईंना पैशाचा खूप माज आला आहे.” असा घणाघात संगीता तिवारी यांनी केला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- अभिजीत दिपके पुन्हा आक्रमक; 5 सप्टेंबरला दिल्लीत मोठा मोर्चा
- वीरेंद्र सेहवागची कार्बन कॉपी! लेक आर्यवीरने मैदानात मारले बापासारखे फटके, व्हिडिओ व्हायरल
- लाडकी बहीण योजना: खात्यात १५०० रुपये जमा, पण ९२ लाख महिला वगळल्याने मोठा गौप्यस्फोट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











