🕒 1 min read
Sanjay Raut । राज्याचे मराठी भाषा मंत्री आणि शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते उदय सामंत यांनी आज पुन्हा एकदा मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी उदय सामंत (UdaySamant) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यात मराठीच्या मुद्द्यावरुन चर्चा झाली.
महाराष्ट्रात जे राहतात त्यांना मराठी बोलता यायला हवे. इतर भाषांचा आम्ही कुणीही अवमान करत नाहीत. पण माझ्या भाषेचा सन्मानही राखला गेला पाहिजे, अशी राज ठाकरेंची भूमिका आहे आणि आमचीही तीच भूमिका असल्याचे उदय सामंत म्हणाले. दरम्यान, त्यांच्या या भेटीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी निशाणा साधला आहे.
Sanjay Raut has criticized Uday Samant and Raj Thackeray
“उदय सामंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली हे चांगलं आहे. भेट घेऊ द्या. त्यांच्याकडे शिवाजी पार्कला एक कॅफे उघडला आहे. चहा पाण्याचे कार्यक्रम, पान सुपारीचे कार्यक्रम होतात आणि वेगवेगळ्या विषयांवर होतात. असे सांस्कृतिक कार्यक्रम तिकडे शिवाजी पार्क व्हायला पाहिजे, नाहीतर तिकडे मराठीपणा त्या भागातला नष्ट होईल”, अशी बोचरी टीका संजय राऊतांनी केली.
महत्वाच्या बातम्या :
- “राजश्री मुंडेंकडेही लग्नाचं सर्टिफिकेट नाही”; Karuna Munde यांचा खळबळजनक दावा
- कुणाल कामरा प्रकरणावरून Sanjay Raut भडकले; म्हणाले, “गृह खातं शेण खात असलं तरी…”
- “संगीता वानखेडेच्या मुली वाल्मिक कराडच्या कलाकेंद्रात…”; Karuna Munde यांचा मोठा दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now