Karuna Munde । अजितदादा गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्याबाबत करुणा मुंडे यांनी आणखी एक मोठा दावा केला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने गेल्या सुनावणीत करुणा मुंडे यांना धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची पत्नी ठरवत महिन्याला 2 लाख रुपयांची पोटगी देण्याचे निर्देश दिले होते. मात्र, करुणा मुंडे (Karuna Munde) यांनी आपल्याला महिन्याला 15 लाख रुपयांची पोटगी हवी असल्याची मागणी केली होती. यानंतर धनंजय मुंडे यांनी आपण करुणा शर्मा यांच्याशी लग्न केल्याचा दावा फेटाळला.
Karuna Munde Made Big Claim About Dhananjay Munde
यानंतर न्यायालयाने करुणा मुंडे यांना लग्नाचे पुरावे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आपण आज न्यायालयात पुरावे सादर करणार असल्याचे करुणा मुंडे यांनी सांगितले. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ‘लग्नाचे सर्टिफिकेट माझ्याकडे जरी नसलं तरी ते राजश्री मुंडे यांच्याकडे देखील नाही’, असा दावा केला आहे.
“आमचं लग्न मंदिरात झालं, त्यावेळी त्यांचे लोक आणि आमचे लोक होते. राजश्री आणि धनंजय मुंडेंचं लग्नही तसंच झालं होतं. त्याकाळात लग्नाचे सर्टिफिकेट होत नव्हते. मात्र, माझ्याकडे इतर पुरावे आहेत आणि ते मी लवकरच कोर्टात सादर करेन”, असे करुणा मुंडे यांनी म्हंटल.
महत्वाच्या बातम्या :