Tanisha Bhise। दोन दिवसांपूर्वी पुण्यात तनिषा भिसे (Tanisha Bhise) या सात महिन्यांच्या गर्भवतीचा मृत्यू झाला. यानंतर पीडित महिलेला पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशाअभावी उपचार नाकारल्याचे आरोप केले आहेत. ही घटना उघडकीस आल्यानंतर राज्यभरातून याबाबात संताप व्यक्त करण्यात येत आहे. अशातच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तज्ञांची समिती स्थापन केली आहे. त्याचबरोबर आता त्यांचा अहवालही समोर आला आहे.
महिला रुग्णासाठी ट्विंस प्रेग्नंसी धोकादायक होती. रुग्ण पहिले सहा महिने तपासणीसाठी रुग्णालयात आलाच नाही. रुग्णाच्या मृत्यूमुळे आलेली निराशा आणि अॅडव्हान्स मागितल्याच्या रागातून दिशाभूल करणारी तक्रार केली गेली, असे रुग्णालयाच्या अहवालात म्हटले गेले आहे. कमी वजनाची ७ महिन्याची जुळी मुलं, जुन्या आजाराची गुंतागुंत आणि कमीत कमी दोन ते अडीच महिने NICU चे उपचार लागतील हे समजावून सांगण्यात आले होते. १० ते २० लाख खर्च येऊ शकतो याची कल्पना देण्यात आली होती.
Tanisha Bhise family objects to Dinanath Mangeshkar Hospital’s report
त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी वैद्यकीय संचालक डॉक्टर केळकर यांना फोन केला आणि आपली अडचण सांगितली. त्यावर डॉक्टर केळकरांनी जमतील तेवढे पैसे भरा असे सांगितले होते. मात्र भिसे कुटुंबीयांनी हॉस्पिटलचा हा अहवाल खोटा असल्याचं म्हंटल आहे.
आम्ही तीन लाख रुपये भरायला तयार होतो. आमच्याकडे पैसेही होते. पैसे घेऊन आम्ही त्या ठिकाणी भरण्यासाठी गेलो होतो. मात्र, त्यांनी पैसे घेतले नाहीत. जोपर्यंत दहा लाख रुपये भरत नाही तोपर्यंत उपचार मिळणार नाही, असं आम्हाला सांगण्यात आलं. एवढा वेळ वाया घालवला नसता तर आज या दोन बाळांची आई आपल्यात असती, असंही भिसे कुटुंबीयांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :