Deenanath Mangeshkar । पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रसूतीचा त्रास होत असणाऱ्या तनिषा भिसे यांना दाखल करण्यासाठी आणण्यात आले होते. मात्र उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णाला दहा लाख रुपये भरण्यासाठी सांगितले. इतके पैसे नसल्याने तिच्यावरती उपचार सुरू केले नाहीत. योग्यवेळी उपचार न मिळाल्यानं या महिलेचा मृत्यू झाला, असा आरोप रुग्णालयावर करण्यात येत आहे.
Big Update Regarding Deenanath Mangeshkar Hospital Woman Death Case
अशातच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तज्ञांची समिती स्थापन केली आहे. त्याचबरोबर आता त्यांचा अहवालही समोर आला आहे. सूर्या हॉस्पिटलच्या माहितीनुसार आधीच्या ऑपरेशनची आणि कॅन्सरसंबंधीची माहिती नातेवाईकांनी लपवून ठेवली होती अशी माहिती समोर येत आहे.
महिला रुग्णासाठी ट्विंस प्रेग्नंसी धोकादायक होती. रुग्ण पहिले सहा महिने तपासणीसाठी रुग्णालयात आलाच नाही. रुग्णाच्या मृत्यूमुळे आलेली निराशा आणि अॅडव्हान्स मागितल्याच्या रागातून दिशाभूल करणारी तक्रार केली गेली, असे रुग्णालयाच्या अहवालात म्हटले गेले आहे.
महत्वाच्या बातम्या :