Tanisha Bhise। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या तनिषा भिसे (Tanisha Bhise) यांना प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आपला जीव गमवावा लागला. या घटनेमुळं रुग्णालय प्रशासनावर मोठ्या प्रमाणावर रोष व्यक्त होताना दिसत आहे. दरम्यान, या प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. सुश्रुत घैसास यांनी राजीनामा (Dr. Sushruta Ghaisas resigns) दिला आहे.
Tanisha Bhise Death Case Update
यांनतर रुग्णालयाचे संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी पत्रकार परिषद घेत “त्या दिवशी गर्भवती महिलेकडे 10 लाखांचे डिपॉझिट मागितले होते”, अशी कबुली दिली. “आम्ही डिपॉझिट घेत नाही, पण त्या दिवशी राहू-केतू काय झालं माहिती नाही, पण 10 लाखांचं डिपॉझिट मागितलं गेलं. डिपॉझिट फक्त त्यांच्यामध्येच घेतले जाते जे पेशंट हाय volume होते. तेही पेशंट गरीब असले तर घेत नव्हते. जे पेशंट भरु शकतात त्यांच्याकडून घेतले जाते”, असे डॉ. केळकर म्हणाले.
राज्यभरात याप्रकरणाचे पडसाद उमटू लागल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी या घटनेच्या चौकशीसाठी धर्मादाय आयुक्तांच्या नेतृत्त्वाखाली पाच सदस्यीय समिती स्थापन केली होती. या समितीने आपला अहवाल प्रधान सचिवांकडे सुपूर्द केला होता. काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अहवालावर चर्चाही झाल्याची माहिती आहे.
या अहवालात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला दोषी ठरवण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर काय कारवाई होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
महत्वाच्या बातम्या :