Share

वेश्यांसोबत संबंध, कितीही वेदना असल्यातरी जबरदस्तीने संबंध; प्रसन्ना शंकरवरती पत्नीचे गंभीर आरोप

Prasanna Shankar Faces Serious Allegations from Wife

सिंगापूरस्थित भारतीय वंशाचे टेक उद्योजक आणि ‘रिप्लिंग’ या बहु-अब्ज डॉलर्सच्या कंपनीचे संस्थापक प्रसन्ना शंकर सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील गंभीर आरोपांमुळे चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर पत्नीवर विवाहबाह्य संबंध असल्याचा दावा केला होता. आता त्यांच्या पत्नीनेही प्रत्युत्तर देत प्रसन्ना शंकर यांच्यावर धक्कादायक आरोप केले आहेत.

पत्नी दिव्या शशिधर यांनी न्यायालयात दाखल केलेल्या निवेदनात असा दावा केला आहे की, प्रसन्नाने त्यांना जबरदस्तीने ‘ओपन मॅरेज’ मध्ये सामील होण्यास भाग पाडले. तसेच त्यांचे अनेक वेश्यांसोबत संबंध होते, त्याने त्यांच्यावर सतत नजर ठेवली आणि खाजगी ठिकाणीही रेकॉर्डिंग केले, असे आरोप करण्यात आले आहेत.

प्रसूतीनंतरही जबरदस्तीने संबंध

दिव्याने आणखी गंभीर दावा करत सांगितले की, प्रसूतीनंतरही शारीरिक वेदनांमध्ये असतानाही प्रसन्नाने जबरदस्तीने संबंध ठेवले. “त्याला फक्त स्वतःच्या गरजा पूर्ण करायच्या होत्या. मी कितीही वेदनेत असले तरी ते त्याच्यासाठी महत्त्वाचे नव्हते,” असे ती म्हणाली.

Prasanna Shankar Faces Serious Allegations from Wife

या दाम्पत्याचे लग्न १० वर्षांपूर्वी झाले होते. काही दिवसांपूर्वी प्रसन्नाने पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोप करत सोशल मीडियावर पोस्ट केली होती. त्यानंतर दिव्याने घरगुती हिंसाचाराचे आरोप करत कायदेशीर लढाई सुरू केली. तिने घटस्फोटासाठी अमेरिकेत अर्ज दाखल केला आहे. प्रसन्ना यांनीही पत्नीवर त्यांच्या ९ वर्षांच्या मुलाला लपवून ठेवल्याचा आरोप करत अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी अमेरिकेतील न्यायालयाने त्यांच्याच बाजूने निर्णय दिला.

Who is Prasanna Shankar?

चेन्नईचे रहिवासी असणारे प्रसन्ना शंकर हे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे माजी विद्यार्थी असून, त्यांनी संगणक शास्त्रात पदवी घेतली आहे. गुगल कोड जॅमसारख्या मंचांवर उत्कृष्ट प्रोग्रामर म्हणून नाव कमावलेल्या प्रसन्नाने गुगल व मायक्रोसॉफ्टमध्ये काम केल्यानंतर स्वतःची ‘रिप्लिंग’ ही कंपनी स्थापन केली.

फोर्ब्सनुसार, सध्या त्यांची एकूण संपत्ती सुमारे १ अब्ज डॉलर्स (९,००० कोटी रुपये) आहे. ( Prasanna Shankar, a Tamil Nadu native and former Google/Microsoft employee, founded Rippling and is reportedly worth over $1 billion. ) सध्या ही वैयक्तिक लढाई न्यायालयात सुरु असून, या दोघांमधील गंभीर आरोप-प्रत्यारोपामुळे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे.

महत्वाच्या बातम्या

Prasanna Shankar, Indian-origin founder of billion-dollar HR tech firm Rippling, is embroiled in a public and legal dispute with his wife, Divya Shashidhar. The couple, married for over a decade, is undergoing a contentious divorce, with allegations surfacing from both sides.

Crime India Marathi News

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या