Sanjay Raut । अमेरिकेला पुन्हा एकदा शक्तिशाली राष्ट्र म्हणून विकसित करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जशास तसे आयात शुल्क (टॅरिफ) लागू करण्याची घोषणा 2 एप्रिलला रात्री केली. त्यानुसार भारतावर 26 टक्के आयात शुल्क (Trump announces 26% tariffs on India) लादण्यात येणार आहे. या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला आहे.
Sanjay Raut Criticized Narendra Modi
“नरेंद्र मोदी हे विष्णूचा अवतार आहेत, ट्रम्प तिथे भारताला धु धु धुतोय आणि विष्णूचे अवतार गप्प आहेत. अख्ख जग ट्रम्पच्या विरोधात उठलं आहे आणि फक्त एकच देश भारत देश तोंडात गोळ्या घालून बसलाय”, असं म्हणत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदींवर टीका केलीय.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचा अवतार आहेत, मग या देवाने ट्रम्पवर सुदर्शन चक्र सोडलं पाहिजे” असंही संजय राऊत म्हणालेत. संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर भाजपकडून काही प्रत्युत्तर येतंय का? हे पाहावं लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- औरंगजेब कबरीच्या मुद्द्यावरून AIMIM चा Sanjay Shirsat यांच्यावर पलटवार; म्हणाले, “तुमच्या बापाचंही नाव…”
- “नरेंद्र मोदी देवाचा नव्हे, माणसाचाच अवतार”; Ramdas Athawale यांचे स्पष्ट मत
- मोठी बातमी- मान्सून 2025 साठी Skymet चा अंदाज जाहीर; महाराष्ट्रात किती पाऊस होणार?