Share

मोदी-मेलोनी यांच्यातली ‘ती’ गोष्ट सोनाक्षी-झहीरच्या घरात; कॅमेऱ्यासमोर अचानक खिशातून काढली अन्…

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी सोशल मीडियावरील प्रसिद्ध मोदी-मेलोनी यांच्या ‘मेलोडी’ चॉकलेट ट्रेंडवर एक अतिशय मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे.

Published On: 

Sonakshi Sinha Melony Trend: सोनाक्षी-झहीरचा मेलोडी व्हिडिओ!

🕒 1 min read

सध्या इंटरनेटवर कोणता ट्रेंड कधी धुमाकूळ घालेल याचा नेम नाही, पण जेव्हा बॉलिवूडचे मोठे सेलिब्रिटी त्यात उडी घेतात, तेव्हा सोशल मीडियाचा पारा चांगलाच वाढतो. असाच काहीसा प्रकार आता अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि तिचा पती झहीर इक्बाल यांच्या बाबतीत घडलाय.

गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचा एक व्हिडिओ प्रचंड चर्चेत आहे. २० मे रोजी मोदींनी मेलोनी यांना प्रसिद्ध ‘मेलोडी’ चॉकलेट गिफ्ट दिल्यानंतर सोशल मीडियावर या दोघांच्या नावावरून ‘मेलोडी ट्रेंड’ तुफान व्हायरल झाला.

Sonakshi Sinha Melony Trend

आता याच भन्नाट ट्रेंडवर सोनाक्षी आणि झहीरने एक भन्नाट रील शेअर करून नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये सुरुवातीला सोनाक्षी एकटीच दिसते.

इतक्यात मागून झहीर येतो आणि तिला विचारतो की, ‘मी तुझ्यावर किती प्रेम करतो हे तुला माहितीये का?’ यावर सोनाक्षी जेव्हा ‘नाही’ म्हणते, तेव्हा झहीर खिशातून थेट ‘मेलोडी’ टॉफी काढतो आणि तिला देतो. ‘मेलोडी खाओ, खुद जान जाओ’ असा मजेशीर सूर पकडत त्याने सोनाक्षीला दिलेले हे उत्तर सध्या इंटरनेटवर गाजत आहे.

Sonakshi Sinha Zaheer Iqbal Melony Trend चा हा व्हिडिओ चाहत्यांच्या भलताच पसंतीस पडला आहे. अनेकांनी झहीरच्या या अचूक टायमिंग आणि ह्युमरचं कौतुक केलंय. २०२४ मध्ये आंतरधर्मीय लग्न केल्यामुळे या जोडप्याला सुरुवातीला मोठ्या ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. पण आता त्यांचे असे रोमँटिक आणि मजेशीर व्हिडिओ चाहत्यांची मनं जिंकत आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!