Sanjay Shirsat । छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाची कबर (Aurangzeb tomb) हटवण्याच्या मुद्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलंय. महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल, असा इशारा विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलानं दिला आहे. अशातच शिवसेना नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी “ज्या ठिकाणी औरंगजेबची कबर आहे, त्याचं नाव खुलताबादवरून बदलून रत्नपूर ठेवावं”, अशी मागणी केली आहे. त्यावर आता AIMIM चे नेते इम्तियाज जलील यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
Imtiaz Jaleel criticized Sanjay Shirsat
“तुम्ही शहरांची, इमारतींची, रस्त्यांची नावं बदलत आहात. आता जर नावं बदलण्याची मालिका सुरूच झाली आहे तर तुम्ही तुमच्या बापाचंही नाव बदलून घ्या. आता अजून राहिलंय तरी काय?”, अशा शब्दात इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या वक्तव्यावर पलटवार केला आहे.
“हिंमत असेल तर गुजरात आणि अहमदाबादची नावं का बदलत नाही? मोदी आणि शाह यांना ही दोन नावं बदलायला सांगा. विचारा त्यांना की, गुजरातमध्ये अहमद भाई चांगलं वाटतं का?”, असे सवाल इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी केले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
‘कोण आफ्रिदी? कोणत्या जोकरचं नाव घेता…’, शाहिद आफ्रिदीचं नाव घेताच असदुद्दीन ओवैसी भडकले