नवी दिल्ली | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांच्याविरोधात आणि त्यांच्या पक्षाची मान्यता रद्द करण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. उत्तर भारतीय विकाससेना ( Uttar Bharatiya Vikas Sena ) पक्षाचे संस्थापक सुनील शुक्ला यांनी ही याचिका दाखल केली असून, राज ठाकरे उत्तर भारतीयांविरोधात द्वेषजनक वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
याचिकेत म्हटले आहे की, राज ठाकरे यांच्या वक्तव्यांमुळे समाजात विभाजन निर्माण होत असून, हिंसाचारास उकळ दिली जात आहे. त्यामुळे मनसे पक्षाची मान्यता निवडणूक आयोगाने रद्द करावी आणि राज्य सरकारने त्यांच्याविरोधात तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी मुंबईतील सुनील शुक्ला यांच्या पक्षाच्या कार्यालयावर मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. तसेच, फोनवर आणि सोशल मीडियावरून धमक्या देण्यात आल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले.
A petition has been filed in the Supreme Court Against Raj Thackeray MNS
सुनील शुक्ला ( Sunil Shukla ) यांच्या याचिकेनंतर मनसेकडून प्रतिक्रिया येत असून, संदीप देशपांडे यांनी भाजपवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, “राज्यात प्रादेशिक पक्ष पुढे येऊ नयेत, म्हणून भाजपने हे षडयंत्र रचले आहे.” मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम ( Sanjay Nirupam ) यांनीही मनसेवर टीका करत म्हटले की, “मराठी भाषेचा आग्रह ठेवण्यात गैर नाही, पण गुंडगिरी योग्य नाही. मनसेच्या कार्यकर्त्यांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.” शहरात नव्याने येणाऱ्या व्यक्तींवर हल्ले करणे योग्य नाही आणि मनसेने न्यायालयीन प्रक्रिया स्वीकारण्याची तयारी ठेवावी.
मुंबईत गेल्या काही दिवसांत ‘मराठी विरुद्ध हिंदी’ असा वाद अधिकच तीव्र झाल्याचे चित्र दिसून येते. काही ठिकाणी हिंदी भाषिकांवर मराठी बोलण्याची सक्ती करण्यात येत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- “…नंतर त्या लाडक्या बहिणींना वाऱ्यावर सो़डायचंय”; Sanjay Raut यांचा सरकारवर निशाणा
- Deenanath Mangeshkar Hospital प्रकरणानंतर PMC ची तात्काळ कारवाई; खासगी रुग्णालयांना ‘डिपॉझिट’ न घेण्याचे आदेश
- मारहाण प्रकरणात Malaika Arora च्या अडचणीत वाढ? कोर्टाकडून जामीनपात्र वॉरंट पुन्हा जारी