मुंबई | अभिनेत्री मलायका अरोराच्या ( Malaika Arora ) अडचणींमध्ये वाढ झाली असून, मुंबईतील मॅजिस्ट्रेट कोर्टाने तिच्याविरोधात 5,000 रुपयांचं जामीनपात्र वॉरंट पुन्हा जारी केलं आहे. 2012 मध्ये अभिनेता सैफ अली खानविरोधात दाखल झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात साक्षीदार म्हणून हजर न राहिल्यामुळे हे वॉरंट जारी करण्यात आलं आहे.
सदर घटना कुलाबा येथील एका फाईव्ह स्टार रेस्टॉरंटमध्ये घडली होती. सैफ अली खान याच्यावर इक्बाल शर्मा नावाच्या व्यक्तीवर हल्ला केल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सैफ अली खान व त्याच्यासोबत असलेले काही मित्र गोंधळ घालत होते. त्यावर इक्बाल शर्माने शांतता राखण्याचे सांगितल्याने सैफने त्याच्या नाकावर घाव केला होता. या मारहाणीत इक्बाल शर्मा जखमी झाला होता, तसेच त्याच्या सासऱ्याला धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
Bailable Warrant Issued Against Malaika Arora
घटनेच्या वेळी अभिनेत्री मलायका अरोरा घटनास्थळी उपस्थित होती. त्यामुळे तिला या प्रकरणात साक्षीदार म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. तिच्यासोबतच अमृता अरोरा, करीना कपूर, करिश्मा कपूर, विक्रम फडणीस आदी उपस्थित होते. अमृता अरोराने यापूर्वी सैफने मारहाण करतानाचा अनुभव कोर्टात मांडला होता.
मलायकाला यापूर्वीही समन्स बजावण्यात आले होते. मात्र ती कोर्टासमोर हजर न राहिल्यामुळे सोमवारी तिच्याविरोधात पुन्हा एकदा जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले. पुढील सुनावणी 29 एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती आहे.
महत्वाच्या बातम्या
- “तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी पळवाटा…”; Vijay Wadettiwar यांची घणाघाती टीका
- Kunal Kamra याला दिलासा; मद्रास उच्च न्यायालयाने दिला महत्वाचा निर्णय
- Tanisha Bhise मृत्यूप्रकरणात डॉ. केळकर यांचा धक्कादायक खुलासा; म्हणाले, “त्या दिवशी…”