Share

मलायका अरोरा पुन्हा प्रेमात? १९ वर्षांनी लहान हिरे व्यापाऱ्याच्या मिठीत; ‘त्या’ व्हायरल फोटोने इंटरनेटवर खळबळ!

मलायका अरोरा आणि १९ वर्षांनी लहान हिरे व्यापारी हर्ष मेहता यांचा रोममधील एक रोमँटिक फोटो व्हायरल झाला असून, दोघांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलंय.

Published On: 

Malaika Arora Harsh Mehta: मलायका पुन्हा प्रेमात?

बॉलिवूडमध्ये कधी कोणाचं कोणाशी सूत जुळेल, हे सांगता येत नाही. अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर मलायका अरोराच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाची एन्ट्री झाल्याची जोरदार चर्चा सुरू झालीये. निमित्त ठरलाय तो इंटरनेटवर धुमाकूळ घालणारा एक नवा फोटो!

नुकताच सोशल मीडियावर एक फोटो तुफान व्हायरल झालाय. यात ५२ वर्षीय मलायका अरोरा (Malaika Arora) एका तरुणाच्या मिठीत रोमँटिक अंदाजात दिसत आहे. हा तरुण दुसरा तिसरा कोणी नसून ३३ वर्षीय प्रसिद्ध हिरे व्यापारी हर्ष मेहता (Harsh Mehta) आहे. सूत्रांनुसार, या दोघांनी इटलीच्या रोममध्ये व्हॅलेंटाईन डे एकत्र साजरा केला असून तिथेच हा सेल्फी काढण्यात आलाय.

Malaika Arora Harsh Mehta

पण या व्हायरल फोटोवरून आता वेगळीच खळबळ उडाली आहे. एका रेडिट युजरने हा फोटो शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडलाय. काहींनी तर हा फोटो ‘स्टेज्ड’ किंवा पीआर स्टंट असल्याचा संशय व्यक्त केलाय. ‘जणू स्टुडिओ लाईट्स लावूनच हा फोटो काढलाय, हा प्रमोशनचा भाग तर नाही ना?’ अशी खोचक टीका अनेक युजर्स करत आहेत.

मलायका आणि अर्जुन कपूरच्या वयात १२ वर्षांचं अंतर होतं. आता हर्ष आणि मलायकाच्या वयात तब्बल १९ वर्षांचं मोठं अंतर आहे. अर्जुनसोबतचं नातं तिने खुलेपणाने स्वीकारलं होतं. मात्र, हर्षसोबतच्या नात्यावर मलायकाने अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नाही. त्यामुळे हे नातं खरं आहे की निव्वळ अफवा, हा प्रश्न कायम आहे.

अरबाज खानशी घटस्फोट आणि अर्जुनसोबत ब्रेकअप होऊनही मलायकाचा लग्नावरचा विश्वास उडालेला नाही. एका जुन्या मुलाखतीत ती म्हणाली होती, “जर लग्न झालं तर ते चांगलं आहे, अन्यथा मी ते करणार नाही.” नेहमीप्रमाणे ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करत ती स्वतःच्या अटींवर आयुष्य जगत आहे. आता या नव्या पर्वाची अधिकृत घोषणा ती कधी करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install