Share

दीपाली सय्यदच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर; घरच्यांनी लपवलं सत्य, अभिनेत्रीचा नवरा म्हणाला…

बिग बॉस मराठी ६ मध्ये असलेल्या दीपाली सय्यद यांच्या सासूबाईंचे निधन झाले आहे. मात्र गेमवर परिणाम होऊ नये म्हणून नवऱ्याने हे सत्य लपवले आहे.

Published On: 

Deepali Sayyad Bigg Boss: कुटुंबावर दुःखाचा डोंगर!

बिग बॉसच्या घरात सध्या स्पर्धक ट्रॉफीसाठी जीवतोड मेहनत करत आहेत. पण बाहेरच्या जगात त्यांच्या कुटुंबात काय घडतंय, याची त्यांना जराही कल्पना नसते. असाच एक मोठा धक्कादायक प्रकार आता समोर आलाय.

राजकारण आणि मनोरंजन अशा दोन्ही आघाड्यांवर सक्रीय असणारी अभिनेत्री दीपाली सय्यद सध्या ‘बिग बॉस मराठी ६’ (Bigg Boss Marathi 6) मध्ये उत्तम गेम खेळत आहे. पण ती घरात असतानाच बाहेर तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मात्र, तिच्या घरच्यांनी जाणीवपूर्वक ही गोष्ट दीपालीपासून लपवून ठेवली आहे.

Deepali Sayyad Bigg Boss

नुकतंच ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत दीपालीचे पती बॉबी यांनी हा मोठा गौप्यस्फोट केला. बॉबी यांच्या आईचे, म्हणजेच दीपालीच्या सासूबाईंचे २ फेब्रुवारी रोजी निधन झाले आहे. सासूबाई आणि दीपालीचं नातं अगदी मायलेकीसारखं होतं.

“माझी आई कायम म्हणायची की तू बिग बॉस जिंकूनच ये. ती आता खूप चांगला गेम खेळतेय, त्यामुळे आम्ही तिला ही वाईट बातमी अजून सांगितली नाही,” असा खुलासा बॉबी यांनी केला. घरात सासूला डॉक्टरकडे नेण्यापासून सगळी काळजी दीपालीच घ्यायची.

दीपालीची अनुपस्थिती कुटुंबाला चांगलीच जाणवत आहे. बॉबी पुढे म्हणाले, “आता मला दीपालीची खूप आठवण येतेय, कारण घरातले सगळे निर्णय आता मलाच घ्यावे लागतायत.” आई जेव्हा शेवटच्या क्षणी कोणाशी बोलत नव्हती, तेव्हा आम्ही तिला दीपालीचा आवाज ऐकवायचो, अशी भावनिक आठवणही त्यांनी सांगितली.

दीपालीचा मुलगा अली यानेही या मुलाखतीत मन मोकळं केलं. “शेवटच्या क्षणापर्यंत आजी फक्त पप्पा आणि आईलाच शोधत होती,” असं तो म्हणाला. दोन वेळा ॲडमिट करूनही त्या परत आल्या होत्या, त्यामुळे यावेळीही त्या ठणठणीत बऱ्या होतील असं कुटुंबाला वाटलं होतं. आता बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर दीपालीला हा मोठा धक्का कसा सहन होईल, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install