Share

BCCI चा मोठा निर्णय; अंध क्रिकेटपटूंसाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध करुन देणार

बीसीसीआयने अंध क्रिकेटपटूंसाठी विशेष सहाय्य योजनेची घोषणा केली आहे. याअंतर्गत परदेशी दौऱ्यांचा खर्च आणि आंतरराष्ट्रीय स्टेडियम्सची सुविधा खेळाडूंना मिळणार आहे.

Published On: 

BCCI Blind Cricket: अंध क्रिकेटपटूंसाठी मोठा निर्णय!

क्रिकेट वेड्या भारतात मुख्य टीम इंडियाच्या विजयाचे गोडवे सगळेच गातात. पण देशाचं नाव जगात वारंवार उंचावणाऱ्या अंध क्रिकेटपटूंकडे मात्र कायमच दुर्लक्ष झाल्याचं चित्र होतं. आता मात्र हे चित्र पूर्णपणे बदलणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) एक ऐतिहासिक पाऊल उचललं असून, जगभरातील क्रीडा विश्वाचं लक्ष वेधून घेतलंय.

बीसीसीआयने ‘क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडिया’ (CABI) साठी एका विशेष आणि महत्त्वपूर्ण सहाय्य योजनेची अधिकृत घोषणा केली आहे. आता अंध पुरुष आणि महिला राष्ट्रीय संघांना दरवर्षी दोन परदेशी स्पर्धांसाठी आंतरराष्ट्रीय प्रवासाचा खर्च थेट बीसीसीआय उचलणार आहे.

BCCI Blind Cricket

केवळ प्रवासाचा खर्चच नाही, तर भारतात होणाऱ्या द्विपक्षीय मालिकांदरम्यान खेळाडूंच्या निवासाची संपूर्ण जबाबदारीही बोर्डच घेणार आहे. या निर्णयामुळे देशातील Blind Cricket ला मोठे बळ मिळणार आहे. आता देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी या खेळाडूंना बीसीसीआय संलग्न स्टेडियम आणि मैदाने वापरण्यासाठी थेट खुली करून दिली जाणार आहेत.

२०१२ पासून भारतीय अंध पुरुष संघाने अनेक विश्वचषक जिंकून देशाची मान उंचावली आहे. तर दुसरीकडे, महिला संघानेही अलीकडेच ऐतिहासिक विश्वचषक पटकावला होता. मात्र निधीअभावी अनेकदा त्यांच्या वाटचालीत मोठे अडथळे यायचे. बीसीसीआयच्या या मदतीमुळे अंध क्रिकेटचा आर्थिक वनवास संपणार आहे.

या संपूर्ण प्रक्रियेत आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष जय शाह यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. CABI चे अध्यक्ष डॉ. महांतेश जी. किवदासनवर आणि सरचिटणीस शैलेंद्र यादव यांच्यासोबत झालेल्या सविस्तर चर्चेनंतर या महत्त्वपूर्ण निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. बीसीसीआयच्या या दमदार खेळीमुळे सध्या सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही