Share

Tanisha Bhise मृत्यूप्रकरणात डॉ. केळकर यांचा धक्कादायक खुलासा; म्हणाले, “त्या दिवशी…”

Deenanath Mangeshkar hospital Dr. Dhananjay Kelkar reaction On Tanisha Bhise Death Case

Tanisha Bhise | पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या तनिषा भिसे (Tanisha Bhise) यांना प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आपला जीव गमवावा लागला. या घटनेमुळं रुग्णालय प्रशासनावर मोठ्या प्रमाणावर रोष व्यक्त होताना दिसत आहे. दरम्यान, या प्रकरणी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. सुश्रुत घैसास  यांनी राजीनामा (Dr. Sushruta Ghaisas resigns) दिला आहे.

त्यांनी आपला राजीनामा रुग्णालयाचे संचालक डॉ. धनंजय केळकर यांच्याकडे सुपूर्द केला. डॉ. सुश्रुत घैसास यांच्या राजीनाम्यानंतर डॉ. धनंजय केळकर यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. दरम्यान, त्या दिवशी गर्भवती महिलेकडे 10 लाखांचे डिपॉझिट मागितले होते, अशी कबुली मंगेशकर रुग्णालयाचे डीन डॉ. केळकर यांनी दिली आहे.

Dr. Dhananjay Kelkar On Tanisha Bhise Death Case

“आम्ही डिपॉझिट घेत नाही, पण त्या दिवशी राहू-केतू काय झालं माहिती नाही, पण 10 लाखांचं डिपॉझिट मागितलं गेलं. डिपॉझिट फक्त त्यांच्यामध्येच घेतले जाते जे पेशंट हाय volume होते. तेही पेशंट गरीब असले तर घेत नव्हते. जे पेशंट भरु शकतात त्यांच्याकडून घेतले जाते”,  असेही डॉ. केळकर म्हणाले. यानंतर मात्र, माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे न देताच त्यांनी पत्रकार परिषद गुंडाळली. या प्रकरणात नवनवीन खुलासे होत असतानाच पुढे काय होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागेलेलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

Dean of Mangeshkar Hospital Dr. Kelkar has admitted that a deposit of Rs 10 lakh was asked from the pregnant woman that day.

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now