Harshvardhan Sapkal । पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या तनिषा भिसे (Tanisha Bhise) यांना प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आपला जीव गमवावा लागला. या घटनेमुळं रुग्णालय प्रशासनावर मोठ्या प्रमाणावर रोष व्यक्त होताना दिसत आहे. अशातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील या संदर्भात मोठी मागणी केली आहे.
Harshvardhan Sapkal demands SIT probe in Tanisha Bhise death case
हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी पुण्यात भिसे कुटुंबाची भेट घेतली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणी एसआयटी चौकशी करा आणि दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे.
ते म्हणाले, “लता मंगेशकर यांच्या जादुई आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केले.पण आता मात्र कोण होतास तू? काय झालास तू? अशी अवस्था त्यांची झाली आहे. एका गर्भवती महिलेला पैशासाठी साडेपाच ताटकळत ठेवून उपचार नाकारले. जी घटना झाली ती अत्यंत वाईट आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी मंगेशकर रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घ्यावे. मयत भिसे यांच्या पतीचा व डॉक्टर केळकर यांचा सीडीआर ताब्यात घ्यावा.”
त्याचबरोबर “या रुग्णालयाचे संचालक मंडळ बरखास्त करून सरकारने दवाखाना ताब्यात घ्यावा. डॉ. केळकर व रुग्णालयाच्या विश्वस्त मंडळावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि संपूर्ण प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत एसआयटी चौकशी करावी”, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :