Share

“कुंभमेळ्याचा पैसा ‘पक्षात’ लावण्यासाठी?”; गिरीश महाजनांवर पुण्यातून गंभीर आरोप, अजितदादांनाही ‘तो’ सल्ला!

काँग्रेसने गिरीश महाजनांवर कुंभमेळ्याच्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. “हा पैसा पक्ष फोडण्यासाठी वापरला जातो,” असा दावा सपकाळांनी केला.

Published On: 

Harshwardhan Sapkal vs Girish Mahajan

पुणे– देवाच्या दारात होणारा ‘कुंभमेळा’ आणि राजकारणातील ‘जोडतोड’… यात काही संबंध असेल का? असा धक्कादायक प्रश्न आता एका गंभीर आरोपाने निर्माण केला आहे. पुणे मध्ये बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी गिरीश महाजन यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. “गिरीश महाजन (Girish Mahajan) हे कुंभमेळाचे बजेट विकासासाठी नाही, तर विरोधी पक्ष फोडण्यासाठी वापरतात,” असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे.

सपकाळ इथेच थांबले नाहीत, तर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवरही (Ajit Pawar) तोफ डागली. सरकारमध्ये राहून भाजपवर टीका करणं ही दादांची ‘नुरा कुस्ती’ आहे, असं म्हणत त्यांनी अजितदादांना आरसा दाखवला. “गोचिडासारखं सत्तेला चिकटून राहू नका, हिंमत असेल तर आधी राजीनामा द्या आणि मग टीका करा,” असा सणसणीत टोला त्यांनी लगावला. जैन बोर्डिंग आणि मुंढवा जमीन प्रकरणातील कथित भ्रष्टाचाराची आठवण करून देत, भाजपने अजित पवारांना सत्तेतून बाहेर काढावं, अशी मागणीही सपकाळांनी केली.

“त्या महाजनांपेक्षा तो लाकूडतोड्या बरा…”

दुसरीकडे, Nashik मधील तपोवनातील वृक्षतोडीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही गिरीश महाजनांची पिसे काढली आहेत. सपकाळांच्या आरोपांना बळ देत राज ठाकरे म्हणाले, “त्या महाजनांपेक्षा तो गोष्टीतला लाकूडतोड्या बरा होता, जो सोन्याच्या कुऱ्हाडीला भुलला नाही. पण हे लोक झाडं छाटण्याआधी स्वतःच्या पक्षातील माणसं छाटतात आणि बाहेरून झाडं (आयात उमेदवार) आणून लावतात.”

२०१२ च्या मनसेकालीन कुंभमेळ्याची आठवण करून देत राज यांनी महायुतीवर प्रहार केला. “तेव्हा एकही झाड न तोडता कुंभमेळा गाजला होता. आता मात्र झाडं तोडून जागा मोकळ्या केल्या जात आहेत. साधुसंत गेल्यावर ही जमीन कोणत्या उद्योगपतीच्या घशात घालायची, हे यांचं आधीच ठरलेलं असतं,” असा गंभीर दावा राज ठाकरेंनी केला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही